शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

१४ कोटींच्या कामांच्या ई-निविदेवरून मतभेद

By admin | Updated: November 12, 2014 01:08 IST

अकोला मनपा सत्ताधारी, प्रशासनात जुंपली.

अकोला : शहरातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी शासनाकडून प्राप्त २६ कोटींच्या अनुदानातून १४ कोटी १६ लाखांच्या कामांसाठी ई-निविदा जारी करण्याच्या मुद्यावरून प्रशासन आणि सत्ताधार्‍यांमध्ये मतभेद झाले आहेत. ई-निविदा प्रक्रिया जारी न करण्याची सूचना वजा आदेश मंगळवारी महापौरांनी दिल्यावर प्रशासन त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे. महापालिकेला मूलभूत सुविधा व विकासकामांसाठी शासनाकडून २६ कोटींचा निधी प्राप्त झाला. यामध्ये मजीप्राला ११ कोटी ८४ लाख अनुदान देण्याचा ठराव मंजूर केल्यानंतर उर्वरित १४ कोटी १६ लाखांतून शहरात विकासकामे होतील. यामध्ये प्रत्येक नगरसेवकाला विकासकामांसाठी १५ लाख रुपये देण्याचा ठराव सभागृहाने पारित केला होता. त्यानंतर प्रभारी आयुक्त शिवाजी दिवेकर यांनी १४ कोटी १६ लाखांच्या विकासकामांसाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. एका नगरसेवकाने १५ लाखांत दोन किंवा तीन विकासक ामे सूचवल्यास संबंधित विकासकामांची किंमत दहा लाखांच्या वर जात नाही. नियमानुसार एका विकासकामाची निविदा दहा लाखांच्या वर गेल्यास ई-निविदा प्रक्रिया राबवता येते. मुळात, प्रभागनिहाय कामांची ई-निविदा काढल्यास या मुद्यावर प्रचंड वादंग निर्माण होईल, हे गृहीत धरूनच प्रशासन ई-निविदेवर ठाम आहे. शिवाय,या मुद्यावर महापौर, उपमहापौर ठाम भूमिका घेत नसल्याचा रोष नगरसेवकांमध्ये पसरला असून, सत्तापक्ष भाजप-शिवसेनेत अंतर्गत कलह निर्माण झाले आहेत.