शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

उपायुक्तांनी हटविला मंडप उपोषणकर्त्या कंत्राटदारांचा

By admin | Updated: November 30, 2014 00:56 IST

महापौरांच्या दालनात ठिय्या

अकोला: थकीत देयकांच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण पुकारलेल्या जलप्रदाय विभागातील कंत्राटदारांचा मंडप उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी २८ नोव्हेंबरला मध्यरात्री हटवला. ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप करीत २९ नोव्हेंबर रोजी सकाळी संतप्त कंत्राटदारांनी चक्क महापौर उज्ज्वला देशमुख यांच्या दालनात गाद्या टाकून ठिय्या आंदोलन छेडले. या प्रकरणी कंत्राटदारांनी उपायुक्त चिंचोलीकर यांच्या विरोधात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.मनपा जलप्रदाय विभागामार्फत सबर्मसिबल, हातपंप, जलवाहिनी दुरुस्तीची कामे करणार्‍या कंत्राटदारांचे २ कोटी ३0 लाखांचे देयक थकीत आहे. जुलै २0१४ मध्ये संबंधित कामाचा कंत्राट संपल्यानंतर पुढील कामासाठी प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवली; परंतु मागील सहा महिन्यांचे थकीत देयक अदा केल्यानंतर पुढील कामाच्या निविदा स्वीकारण्याची भूमिका कंत्राटदारांनी घेतली. या मुद्यावर प्रशासनाकडून कंत्राटदारांचे थकीत देयक अदा करण्यास टाळाटाळ केली जात आहे. प्रशासनाची भूमिका लक्षात घेत, कंत्राटदारांनी १८ ऑक्टोबर २0१४ पासून मनपालगत बेमुदत उपोषण छेडले. प्रशासन दखल घेत नसल्याचे पाहून १४ नोव्हेंबर रोजी १३ कंत्राटदारांनी मनपा आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी हा प्रयत्न उधळून लावल्याने कंत्राटदारांनी पुन्हा २६ नोव्हेंबर रोजी आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी कंत्राटदारांवर लाठीहल्ला चढविला. अचानक उपायुक्त चिंचोलीकर यांनी २८ नोव्हेंबरच्या मध्यरात्री उपोषणकर्त्यांंचा मंडप जेसीबीच्या मदतीने हटविण्याची कारवाई केली. मंडप काढल्यामुळे संतप्त कंत्राटदारांनी महापौर उज्ज्वला देशमुख यांच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडले. दुपारनंतर मनपाच्या प्रवेशद्वारालगत कंत्राटदारांनी उपोषण सुरू ठेवले.