शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू चाचणीसाठी पश्‍चिम व-हाडात फक्त दोन शासकीय केंद्र

By admin | Updated: November 29, 2014 22:26 IST

खासगी पॅथॉलॉजी लॅबची मनमानी

ब्रम्हानंद जाधव/मेहकर (बुलडाणा)संपूर्ण राज्यात डेंग्यू व मलेरिया या साथीच्या आजारांनी सर्वत्र थैमान घातले असताना, वर्‍हाडात केवळ दोनच शासकीय रुग्णालयांमध्ये डेंग्यू चाचणी होत असल्यामुळे, रूग्ण व त्यांचे कुटुंबीय त्रस्त झाले आहेत. दरम्यान, परिस्थितीचा लाभ उचलत, खासगी पॅथॉलॉजी लॅब चालकांकडून रुग्णांचे आर्थिक शोषण सुरू आहे. राज्यात डेंग्यू व मलेरियाने चांगलेच हात-पाय पसरविले असून, यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत, डेंग्यूने २४ पेक्षा अधिक बळी घेतले आहेत. राज्यात डेंग्यूचे ३,५00 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. सप्टेंबरच्या अखेरच्या दिवसांपासून डेंग्यूचा जोर जास्तच वाढला. डेंग्यूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने, रुग्णाला ताप आल्यास त्याची डेंग्यू चाचणी करणे गरजेचे झाले आहे. डेंग्यूची ही चाचणी शासकीय रुग्णालयांमार्फत मोफत केली जाते; परंतू, पश्‍चिम वर्‍हाडात डेंग्यूची चाचणी करण्याची सोय, केवळ अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न सवरेपचार इस्पितळ व वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालय या दोनच ठिकाणी उपलब्ध असल्याने, अनेक रुग्णांना परवडत नसूनही खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये जावे लागत आहेत. खासगी पॅथॉलॉजीमध्ये डेंग्यू चाचणीसाठी प्रचंड शुल्क आकारले जात आहेत. अनेक डॉक्टरांचे व खासगी लॅब चालकांचे साटेलोटे असल्याने, रुग्णांना डॉक्टरांनी सांगितलेल्या खासगी लॅबमध्येच रक्त तपासणीसाठी जावे लागते. पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीनही जिल्ह्यांमधील शासकीय यंत्रणा डेंग्यू चाचणीसाठी कुचकामी ठरत आहे, तर दुसरीकडे रक्त तपासणीसाठी गल्लीबोळात खासगी लॅबही थाटल्या आहेत.डेंग्यू तपासणीचे मनमानी दरडेंग्यू चाचणीकरीता डेंग्यू ह्यएनएस-वनह्ण, ह्यडेंग्यू आयजीजीह्ण, ह्यडेंग्यू आयजीजीएमह्ण या तीन चाचण्या केल्या जातात. खासगी लॅबमध्ये या तिन्ही चाचण्यांच्या दरामध्ये समानता नाही. ह्यएनएस-वनह्णसाठी ७00 ते ८00 रुपये, ह्यआयजीजीह्णसाठी ६00 ते ७00 रुपये, तर ह्यआयजीजीएमह्णसाठी ५00 ते ६00 रुपये असे मनमानी दर आकारले जात आहेत.डेंग्यू चाचणीसाठी शासकीय यंत्रणा कुचकामी बुलडाणा जिल्ह्यातील रुग्णांची शासकीय यंत्रणेमार्फत डेंग्यू चाचणी करायची झाल्यास, रक्ताचे नमुने अकोला येथे पाठवावे लागतात, तर वाशिम जिल्ह्यात डेंग्यू चाचणी केवळ जिल्हा सामान्य रुग्णालयात होत असून, ग्रामीण रुग्णालयात जाणार्‍या रुग्णांच्या हातावर ह्यरेफरह्णचे पत्रच थोपविल्या जात आहे.