रेती वाहतूक करणार्‍या वाहनांवर निर्बंध घालण्याची मागणी

By Admin | Updated: May 3, 2014 19:11 IST2014-05-03T13:23:35+5:302014-05-03T19:11:10+5:30

तालुक्यातील हिरपूर-सांजापूर येथील ग्रामस्थांनी मूर्तिजापूर ते दुर्गवाडादरम्यान रेतीची वाहतूक करणार्‍या वाहनांवर निर्बंध घालण्याची मागणी एका निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.

Demand for Restrictions on Sand Vehicles | रेती वाहतूक करणार्‍या वाहनांवर निर्बंध घालण्याची मागणी

रेती वाहतूक करणार्‍या वाहनांवर निर्बंध घालण्याची मागणी

मूर्तिजापूर : तालुक्यातील हिरपूर-सांजापूर येथील ग्रामस्थांनी मूर्तिजापूर ते दुर्गवाडादरम्यान रेतीची वाहतूक करणार्‍या वाहनांवर निर्बंध घालण्याची मागणी एका निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.
मूर्तिजापूर ते दुर्गवाडादरम्यान रेती वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्टर, ट्रक आदी वाहनांचा वापर केला जातो. या वाहनधारकांचे त्यांच्या वाहनांवर नियंत्रण नसते. मर्यादेपक्षा अधिक वेगाने वाहने चालवून ते वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. रेतीची वाहतूक करणार्‍या बर्‍याच ट्रॅक्टर चालकांजवळ वाहन चालविण्याचा परवाना नसतो. ते फारसे प्रशिक्षितही नसतात. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता अशा वाहनांवर निर्बंध घालण्यात यावे, अशी मागणी बबनराव डाबेराव, शंकरराव ठाकरे, आनंद गणोरकर, अंगद ठाकरे, सभा डाबेराव, अरुण माकोडे, माधव फडनाईक, प्रफुल्ल गावंडे, शंकर अंबाळकर, प्रवीण पांडे आदींनी एका निवेदनाद्वारे केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Demand for Restrictions on Sand Vehicles