शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
3
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
4
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
5
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
6
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
7
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
8
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
9
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
10
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
11
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
12
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
13
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
14
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
15
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
17
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
18
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
19
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
20
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

मोहाळी नदीवरील पुलाची उंची वाढविण्याची मागणी

By admin | Updated: June 16, 2014 12:34 IST

मोहाळी नदीवरील पुलाची उंची फार कमी असल्यामुळे पुराचे पाणी पुलावरून चार ते पाच फूट उंच वाहते. त्यामुळे हा मार्ग नेहमीच बंद पडतो. अशा स्थितीत या पुलाची उंची वाढवणे गरजेचे आहे.

 

 
आकोट : आकोट-हिवरखेड राज्य मार्गावर शहरापासून जवळपास १ कि.मी. अंतरावर वाहणारी मोहाळी नदी पावसाळ्याच्या दिवसात भरभरून वाहते. या नदीवरील पुलाची उंची फार कमी असल्यामुळे पुराचे पाणी पुलावरून चार ते पाच फूट उंच वाहते. त्यामुळे हा मार्ग नेहमीच बंद पडतो. अशा स्थितीत या पुलाची उंची वाढवणे गरजेचे आहे. या प्रकाराकडे लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देत संबंधित विभागाकडून काम करून घेण्याची मागणी होत आहे. 
नदीलगत नगरपरिषदेच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. गतवर्षी केंद्राच्या परिसरात पुराचे पाणी शिरले होते. पुरामुळे कित्येक तास वाहतूक खोळंबत असल्याचा आजवरच्या अनेक पावसाळ्यातील अनुभव आहे. या नदीवरून जाण्या-येण्याकरिता पर्यायी मार्ग नसल्यामुळे पादचार्‍यांनासुद्धा कित्येक तास पुराचे पाणी उतरेपर्यंत वाट पाहावी लागते. वैद्यकीय उपचारासाठी व शिक्षणाकरिता येणार्‍यांची चांगलीच परवड होते. आकोट मुख्य बाजारपेठेचे ठिकाण असल्याने नागरिकांचीसुद्धा मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते. पावसाळ्यात पुरामुळे तासन्तास वाहतूक खोळंबण्याच्या प्रकाराने प्रचंड प्रमाणात इंधनाचा व वेळेचा अपव्यय होतो.आकोट शहर व ग्रामीण भागाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या आकोट-हिवरखेड मार्गावरील या पुलाची नव्याने निर्मिती करून उंची वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे आकोट सार्वजनिक बांधकाम विभागाने पुराच्या पाण्यामुळे सर्वसामान्यांची गैरसोय होऊ नये याकरिता तातडीने नदीमध्ये वाढलेली बेशरमची झाडे तसेच नदीपात्रात साचलेला गाळ काढून खोलीकरण व सरळीकरण करणे आवश्यक आहे.
मोहाळी नदीवरील पूल बांधण्याकरिता तीन वेळा प्रस्ताव पाठविण्यात आले; परंतु शासनाच्या बजेटमध्ये अद्याप पावेतो पुलाच्या कामाला मंजुरात मिळाली नाही, असे सा. बां. विभागाच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. सर्वसामान्य नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात या मार्गावर होणारा त्रास लक्षात घेता लोकप्रतिनिधींनी ही समस्या मार्गी लावावी. (तालुका प्रतिनिधी)