वाडेगाव येथील निर्गुणा नदीवर बंधाऱ्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:19 IST2021-04-08T04:19:39+5:302021-04-08T04:19:39+5:30

प्रधानमंत्री जन विकास मुस्लीम अल्पसंख्याक कार्यक्रमा अंतर्गत मुस्लीम वसाहतीमध्ये काम करण्यासाठी निवेदनात मागणी केली आहे. मौजे वाडेगाव येथील इंदिरा ...

Demand for dam on Nirguna river at Wadegaon | वाडेगाव येथील निर्गुणा नदीवर बंधाऱ्याची मागणी

वाडेगाव येथील निर्गुणा नदीवर बंधाऱ्याची मागणी

प्रधानमंत्री जन विकास मुस्लीम अल्पसंख्याक कार्यक्रमा अंतर्गत मुस्लीम वसाहतीमध्ये काम करण्यासाठी निवेदनात मागणी केली आहे. मौजे वाडेगाव येथील इंदिरा नगर येथील वाॅर्ड क्रमांक ५ मध्ये अंदाजे ३ हजार लोकवस्ती व वाॅर्ड क्रमांक ४ मध्ये अंदाजे ३ हजार लोकवस्ती राहतात. या दोन्ही वाॅर्डातील ग्रामस्थांना बाजार किंवा वैयक्तिक कामासाठी यावे लागते. सोबतच या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठीसुद्धा याचं मार्गाने यावे लागते. या सर्वांना याच नदीपात्रातून ओलांडून येणे-जाणे करावं लागते. याचा ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी वाॅर्ड क्रमांक ५ मधील निर्गुण नदीपत्रावर रपटा पूल कम बंधारा बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी आमदार नितीन देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे.

फोटो:

Web Title: Demand for dam on Nirguna river at Wadegaon