मृत्यूनंतर सहा तासांच्या आत व्हावे देहदान

By Admin | Updated: January 21, 2015 01:03 IST2015-01-21T01:03:36+5:302015-01-21T01:03:36+5:30

अकोला वैद्यकीय महाविद्यालयाला वर्षाला हवेत सहा पार्थिव.

Dehadan should be done within six hours after death | मृत्यूनंतर सहा तासांच्या आत व्हावे देहदान

मृत्यूनंतर सहा तासांच्या आत व्हावे देहदान

सचिन राऊत / अकोला:
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयात विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वर्षाला सहा पार्थिवांची आवश्यकता असल्याची माहिती प्रशासनाद्वारे देण्यात आली. विशेष म्हणजे, देहदान आणि अवयवदानाबाबत जिल्ह्यात चांगल्या प्रकारे जनजागृती असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंत एकही पार्थिव बाहेरगावावरून मागवावे लागले नसल्याची माहिती आहे.
कोणत्याही व्यक्तीने जिवंत असताना देहदान किंवा इतर अवयवांचे दान करण्याचा संकल्प केल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शरीररचनाशास्त्र विभागात त्याची रीतसर नोंदणी होते. मृत्यूनंतर सहा तासांच्या आत पार्थिव रुग्णालय प्रशासनाला सुपूर्द करणे आवश्यक राहते. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हे पार्थिव ह्यफ्रझनह्ण करून ठेवले जाते.
या प्रक्रियेमुळे कोणत्याही व्यक्तीचे पार्थिव हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनेक वर्षे जसेच्या तसे राहते. मृतदेहातील प्रत्येक पेशी, प्रत्येक हाड, मेंदू आणि प्रत्येक अवयव हे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढविण्यासाठी मोलाचा ठरतात.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन देहदानासाठी पुढाकार घेत असून, शरीररचनाशास्त्र विभाग यासाठी विविध उपक्रमही राबवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. देहदान एक अनमोल दान आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान मिळण्यास यामुळे मोठी मदत होत असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाद्वारे देण्यात आली.

*प्रभावती नारेंचे पार्थिव शरीररचनाशास्त्र विभागात
प्रभात किड्सचे संचालक डॉ. गजानन नारे यांच्या मातोश्री माजी शिक्षिका प्रभावती नारे यांचे देहदान करण्यात आल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शरीररचनाशास्त्र विभागात त्यांच्या पार्थिवाचे फ्रझन करण्यात आले. हे पार्थिव आता वर्षानुवर्षे राहणार आहे. एका शिक्षिकेचे पार्थिव मृत्यूनंतरही आता वैद्यकीय विद्यार्थ्यांंच्या ज्ञानात मोलाची भर टाकणार आहे. प्रभावती नारे यांचे हे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

Web Title: Dehadan should be done within six hours after death