देवबाबड्या महाराज अनंतात विलीन

By Admin | Updated: May 29, 2014 01:13 IST2014-05-29T01:10:46+5:302014-05-29T01:13:08+5:30

पिंजर येथील संत गुलालशेष संस्थानचे विश्‍वस्त पुरुषोत्तम भुजंग देशमुख उपाख्य देवबाबड्या महाराज यांचे २६ मे रोजी दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

Debabandhu Maharaj merged the infinity | देवबाबड्या महाराज अनंतात विलीन

देवबाबड्या महाराज अनंतात विलीन

पिंजर: येथील संत गुलालशेष संस्थानचे विश्‍वस्त पुरुषोत्तम भुजंग देशमुख उपाख्य देवबाबड्या महाराज यांचे २६ मे रोजी दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार २७ मे रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. देवबाबड्या महाराजांच्या निधनाची वार्ता पसरताच अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, बुलडाणा आदी जिल्हय़ातील त्यांच्या भक्तांनी दर्शनासाठी सोमवारपासूनच रीघ लावली होती. मंगळवार २७ मे रोजी सकाळी ९.00 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघाली. त्यावेळी त्यांचे हजारो भाविक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. पिंजर येथील पुरुषोत्तम भुजंग देशमुख उपाख्य देवबाबड्या महाराज हे लहानपणापासूनच आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात होते. त्यांनी १९८0-८१ मध्ये संत गुलाबशेष संस्थानचा जीर्णोद्धार केला होता. या गुलाबशेष महाराज मंदिरात नागपंचमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्र ामांचा सप्ताह पार पडतो. पौष महिन्यातही दहीहंडी, महाप्रसादाचे आयोजन केले जाते. पुरुषोत्तम भुजंग देशमुख उपाख्य देवबाबड्या महाराज यांनी आपले संपूर्ण आयुष्य धार्मिक कार्याला लावले. महाराजांवर अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ आदी जिल्हय़ांतील भाविकांची मोठी श्रद्धा होती. त्यांच्या निधनाची वार्ता कानावर पडताच पिंजरसह परिसरातील गावांत शोककळा पसरली. हजारो भाविकांनी २७ मे रोजी महाराजांना साश्रूनयनांनी अंतिम निरोप दिला. पुरुषोत्तम भुजंग देशमुख उपाख्य देवबाबड्या महाराज यांना हजारो भाविकांच्या उपस्थितीत कारंजा मार्गावर असलेल्या गुलाबशेष महाराज मंदिराजवळ समाधी देण्यात आली.

Web Title: Debabandhu Maharaj merged the infinity