शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

दिवस ४३; कामे ५२0!

By admin | Updated: May 16, 2015 00:55 IST

अकोला जिल्ह्यात पाणीटंचाई निवारण उपाययोजनांची केवळ २७ कामे पूर्ण.

संतोष येलकर /अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात ४५८ गावांमध्ये ५८२ उ पाययोजनांची कामे प्रस्तावित असली तरी, १४ मेपर्यंत जिल्ह्यात केवळ २७ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. पाणीटंचाई निवारणाची कामे करण्यास केवळ ४३ दिवसांचा कालावधी उरला असून, या कालावधीत कृती आराखड्यातील राहिलेली ५२0 उपाययोजनांची कामे पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात हिवाळ्यातच पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली. तापत्या उन्हासोबतच ग्रामीण भागात पाणीटंचाईचा प्रश्न तीव्र होत असून, पिण्याच्या पाण्यासाठी गावागावांमध्ये ग्रामस्थांची पायपीट सुरू आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत ४५८ गावांसाठी ५८२ उपाययोजनांच्या कामांचा कृती आराखडा तयार करण्यात आला. ११ कोटी ८३ लाख ३२ हजार रुपये खर्च प्रस्तावित असलेल्या या आराखड्याला १७ डिसेंबर २0१४ रोजी जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी मंजुरी दिली. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत सादर करण्यात आलेल्या प्रस् तावांनुसार एकूण उपाययोजनांपैकी १७७ उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकार्‍यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मान्यता देण्यात आलेल्या कामांपैकी १३ मे पर्यंत जिल्ह्यात केवळ २७ उपाययोजनांची कामे सुरू करण्यात आली असून, ५३ उपाययोजनांची कामे सुरू आहेत. पाणीटंचाई निवारणासाठी उ पाययोजनांच्या कामांचा आराखडा मंजूर झाल्यानंतर पाच महिन्यांचा कालावधी उलटून गेला. एकूण उ पाययोजनांच्या कामांपैकी केवळ २७ उपाययोजनांचीच कामे पूर्ण झाली. पाणीटंचाई निवारणाची कामे ३0 जूनपर्यंत करता येतील, पावसाळ्यात ही कामे करता येणार नाहीत, त्यामुळे पाणीटंचाई निवारणासाठी उ पाययोजनांची कामे करण्यास शिल्लक राहिलेल्या ४४ दिवसांत कृती आराखड्यातील उर्वरित ५२0 उ पाययोजनांची कामे केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. पाणीटंचाईच्या समस्येने ग्रामस्थ हैराण झाले असल्याच्या स्थितीत दुसरीकडे मात्र शेकडो उपाययोजनांची कामे रखडली आहेत.