पळसोबढे येथे वीज पडून मंदिराचे नुकसान

By Admin | Updated: May 30, 2015 01:52 IST2015-05-30T01:52:26+5:302015-05-30T01:52:26+5:30

७५0 फूट लांबीची केबल जळाली; सुदैवाने प्राणहानी टळली.

Damage to the temple by electricity in Palsodbhathe | पळसोबढे येथे वीज पडून मंदिराचे नुकसान

पळसोबढे येथे वीज पडून मंदिराचे नुकसान

पळसोबढे (जि. अकोला ): अचानक सुरू झालेल्या ढगांच्या कडकडाटासोबत वीज पडून येथील एका मंदिराचे नुकसान झाले तर गावातील ७५0 फूट टिव्हीची केबल जळून खाक झाली. सुदैवाने यावेळी मंदिराजवळ कुणीही नसल्याने प्राणहानी टळली. ही घटना २९ मे रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.
येथे दुपारी ३ वाजतानंतर अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यानंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. तेव्हा ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू होता. यावेळी जोरदार आवाजासह अचानक गावातील जगदंबा मंदिरावर वीज पडली. यामुळे सदर मंदिराचा तीन बाय पाच फूट लांबीचा कोपरा खचला. त्याचा मलबा रस्त्यावर पडला. त्याचप्रमाणे वॉर्ड क्र.४ पासून ते वॉर्ड क्र.५ पर्यंत असलेला ७५0 फूट लांबीची टीव्ही जोडण्या देण्यासाठी वापरलेली केबल जळून गेली. वास्तविक पाहता पळसोबढे येथील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये ग्रामपंचायत समोर वीजरोधक यंत्र बसविलेले होते. ते यंत्र सध्या तुटलेल्या अवस्थेत आहे. पूर्वी ते कार्यरत होते. तोपर्यंत गावात कधीही वीज पडली नव्हती. आता ते तुटून पडलेले असल्यामुळे हा वीज पडण्याचा प्रकार घडला असल्याचे लोकांमध्ये बोलले जात आहे.

Web Title: Damage to the temple by electricity in Palsodbhathe