एका हाॅटेलसह दाेन मंगल कार्यालयाच्या संचालकाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:51 IST2020-12-04T04:51:37+5:302020-12-04T04:51:37+5:30

अकाेला : क्षमतेपेक्षा अधिक आवाजात बॅन्ड वाजविल्याप्रकरणी तसेच डीजे वाजविल्याप्रकरणी दीपक गावंडे यांनी सिव्हिल लाइन्स पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन ...

Crime against the director of Daen Mangal office including a hotel | एका हाॅटेलसह दाेन मंगल कार्यालयाच्या संचालकाविरुद्ध गुन्हा

एका हाॅटेलसह दाेन मंगल कार्यालयाच्या संचालकाविरुद्ध गुन्हा

अकाेला : क्षमतेपेक्षा अधिक आवाजात बॅन्ड वाजविल्याप्रकरणी तसेच डीजे वाजविल्याप्रकरणी दीपक गावंडे यांनी सिव्हिल लाइन्स पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पाेलिसांनी जठारपेठ चाैकातील हाॅटेल शगुन, उत्सव मंगल कार्यालय व सावरकर सभागृहाच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जठारपेठ चाैकातील हाॅटेल शगुन, उत्सव मंगल कार्यालय व सावरकर सभागृहात ३० नाेव्हेंबर राेजी विवाह साेहळा असल्याने माेठ्या प्रमाणात डीजे व बॅन्ड वाजिवण्यात आला. यासाेबतच संपूर्ण भारतात माेठे फटाके फाेडण्यावर बंदी असतानाही या ठिकाणी माेठ्या प्रमाणात फटाके फाेडण्यात आले. त्यामुळे या तीनही मंगल कार्यालयांच्या संचालकांनी राष्ट्रीय हरीत लवाद प्रधान खंडपीठ नवी दिल्ली यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे तसेच ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध सिव्हिल लाइन्स पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crime against the director of Daen Mangal office including a hotel