आरोपी युवकाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला!

By Admin | Updated: August 29, 2015 00:14 IST2015-08-29T00:14:51+5:302015-08-29T00:14:51+5:30

युवतीचे लैंगिक शोषण प्रकरण.

Court rejects bail plea of ​​the accused! | आरोपी युवकाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला!

आरोपी युवकाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला!

अकोला : डाबकी रोडवरील रहिवासी असलेल्या एका २0 वर्षीय युवतीशी विविध ठिकाणी व वारंवार बलात्कार करणार्‍या दत्त कॉलनी येथील रहिवासी आदित्य मधुकर पवार याचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला. डाबकी रोडवरील रहिवासी असलेली एक २0 वर्षीय युवती दत्त कॉलनीतील आदित्य मधुकर पवार याची मैत्रीण असून, त्याने सदर युवतीला शीतपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन तसेच लग्नाचे आमिष दाखवित तिच्यावर बलात्कार केला. शेगाव, दत्त कॉलनीतील ग्राऊंड यासह विविध ठिकाणांवर या युवतीवर आदित्य पवारने बलात्कार केल्याचा आरोप युवतीने केला आहे. त्यानंतर सदर युवतीने आदित्य पवारला लग्न करण्यासंदर्भात विचारणा केली असता आदित्य तिला टाळाटाळ करीत होत असे युवतीचे म्हणणे आहे. वारंवार विनंती करूनही आदित्य प्रतिसाद देत नसल्याने या युवतीने सदर प्रकरणाची तक्रार काही महिन्यांपूर्वी खदान पोलीस ठाण्यात केली होती; मात्र पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल न करता खदान पोलिसांनी हे प्रकरण चौकशीत ठेवले. त्यामुळे या युवतीने आदित्य पवार याच्याविरुद्ध जिल्हा न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने आदित्य पवार याच्याविरुद्ध बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर खदान पोलिसांनी आदित्य पवारविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर याप्रकरणी आदित्य पवार याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एन. तांबी यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली. न्यायालयाने आदित्यचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

Web Title: Court rejects bail plea of ​​the accused!