देशी दारूचा अवैध साठा जप्त; आरोपीस अटक

By Admin | Updated: May 29, 2014 23:24 IST2014-05-29T20:52:46+5:302014-05-29T23:24:21+5:30

उरळ पोलिसांनी माजरी येथे दारूची अवैध विक्री करणार्‍या दोघांवर छापा टाकुन एका आरोपीस अटक.

The country's illegal liquor seized; The accused arrested | देशी दारूचा अवैध साठा जप्त; आरोपीस अटक

देशी दारूचा अवैध साठा जप्त; आरोपीस अटक

उरळ: स्थानिक पोलिसांनी गुरुवारी जवळच असलेल्या माजरी येथे दारूची अवैध विक्री करणार्‍या दोघांवर छापा मारून त्यांच्याकडून देशी दारूच्या ४७ क्वॉर्टर (किंमत १८८०) जप्त केल्या व एका आरोपीस अटक केली. एक आरोपी महिला पळून जाण्यात यशस्वी झाली.
पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, उरळ पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी चार वाजताचे दरम्यान मांजरी येथे अवैध दारू विक्रेत्यांवर छापा मारला. यावेळी पोलिसांनी त्रिशला गोविंद खंडारे (३०) हिच्याकडून देशी दारुच्या २३ क्वॉटर्र जप्त केल्या; परंतु त्रिशला पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेली. या दारूची किंमत ९२० रुपये आहे. दरम्यान, पोलिसांनी याच गावातील महेश अरुण हेरोडे याच्या घरी छापा मारून त्याच्याकडून देशी दारूच्या २४ क्वॉर्टर जप्त केल्या व त्याला अटक केली. या दारूची किंमत ९६९ रुपये आहे. जमादार कैलास पेटकर, पो.कॉ. शालीग्राम इंगळे व विश्वनाथ डांगे यांनी ही कारवाई केली.  

Web Title: The country's illegal liquor seized; The accused arrested