शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कापसाचे उत्पादन पोहोचणार ९0 लाख गाठींपर्यंत

By admin | Updated: January 9, 2015 01:20 IST

तज्ज्ञांचा अंदाज, संक्रांतीनंतर वाढेल आवक.

अकोला : राज्यात ८५ लाख कापूस गाठींचे उत्पादन अपेक्षित होते; परंतु अवकाळी पावसामुळे या उत्पादनात आठ ते दहा टक्के वाढ होऊन, हे उत्पादन ९0 लाख गाठीपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. संक्रांतीनंतर बाजारात कापसाची आवक वाढेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. गत खरीप हंगामात राज्यात ४२ लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची पेरणी करण्यात आली होती. विदर्भात १७ लाख हेक्टरच्यावर कापसाचे क्षेत्र आहे; पण खरीप हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने कापूस उत्पादनाला फटका बसला आहे. असे असले तरी ८५ लाख कापूस गाठी उत्पादन अपेक्षित धरण्यात आले आहे. गत आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. त्या आठवड्यात अकोला जिल्हय़ात एकाच दिवशी ५0 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. अवकाळी पावसामुळे कापूस झांडाना पुन्हा जीवदान मिळाले असून, अनेक ठिकाणी हे पीक पुन्हा फुलोर्‍यावर येत आहे. त्यामुळे कापसाचे उत्पादन वाढण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली असून, कापसाचे उत्पादन आठ ते दहा टक्कय़ांनी वाढण्याची शक्यता आहे.राज्यात शनिवारपर्यंत ६१ लाख क्विंटल कापूस शेतकर्‍यांनी विकला असून, यातील २६ लाख क्विंटल कापूस भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) खरेदी केला आहे; पण सीसीआय आणि महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाचे कापूस दर प्रतवारीच्या निकषावर ठरले असल्याने शेतकर्‍यांना हमी दरापेक्षा प्रतिक्विंटल शंभर ते दीडशे रुपये कमी दर दिले जात आहेत. परिणामी शेतकर्‍यांचा ओढा खासगी बाजाराकडे आहे. असे असले तरी कापसाचे दर वाढतील, या अपेक्षेवर सधन शेतकर्‍यांनी अद्याप कापूस विकण्यासाठी काढलेला नाही. आतापर्यंत बाजारात जो कापूस विकण्यात आला आहे, तो मुख्यत्वे अल्पभूधारक शेतकर्‍यांचा आहे. संक्रांतीनंतर मात्र बाजारपेठेत कापसाची आवक वाढण्याची शक्यता आहे. फरदडीला कापूस येतोच. आता फुलोरा आला असेल, तर शेतकर्‍यांना त्यासाठी रसशोषण किडी, मावा आदीबाबत दक्षता घ्यावी लागणार आहे. अन्नद्रव्यासाठी डीएपी, युरियाची फवारणी करणे क्रमप्राप्त असल्याचे जेष्ठ कापूस संशोधक डॉ. आदीनाथ पसलावार यांनी स्पष्ट केले. *फरदडीला कापूस येतो२0१२-१३ मध्ये अवकाळी पाऊस आल्यानंतर, त्यावर्षी फरदडपासून शेतकर्‍यांना दोन ते तीन क्विंटल कापसाचे उत्पादन वाढले होते. यावर्षीदेखील अवकाळी पाऊस झाल्याने, उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.