शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : 'डिस्चार्ज' देऊन घरी पाठविलेला युवक पुन्हा 'पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 12:01 IST

युवकाचा रिपोर्ट पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने त्याच्या कुटुंबालाही बाधा होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

अकोला : देशमुख फैल परिसरातील रहिवासी असलेल्या एका २७ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसात त्याला घरी पाठविण्याचा प्रताप सर्वोपचार रुग्णालय व महापालिका प्रशासनाने केला. या युवकाचा रिपोर्ट पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने त्याच्या कुटुंबालाही बाधा होण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, बाधित तरुणाचा व्हिडिओ हा त्याचा पुरावा असून, या गंभीरप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केली आहे. जिल्हा प्रशासन व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अक्षम्य हलगर्जीमुळे अकोल्यात कोरोनाचा हॉटस्पॉट तयार झाला आहे, असा आरोपही पातोडे यांनी केला. बाधित रुग्णाने व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, माझे स्वॅब १९ मे रोजी तपासणीला दिले होते. २१ तारखेला माझा वैद्यकीय रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर महापालिकेचे अधिकारी आणि पोलिसांनी रुग्णवाहिकेतून मला सर्वोपचारमध्ये दाखल केले. पाच दिवसाचा उपचार केल्यानंतर मला डिस्चार्ज कार्ड देऊन पीडीकेव्ही येथे विलगीकरण केंद्रात पाठविण्यात आले. डिस्चार्ज कार्डवर १ मे ते १४ मे २०२० असा चुकीच्या तारखेचा उल्लेख करण्यात आला. विलगीकरण कक्षातून मला २९ मे रोजी सायंकाळी घरी सोडून देण्यात आले. पीडीकेव्ही येथून मला कोणतेही औषध दिले नाही. मी स्वॅब टेस्टची मागणी केल्यानंतर कोणत्याही अधिकाºयाने माझ्याशी संवाद साधला नाही; मात्र पुढील दोन दिवस माझ्या घशात सतत खवखव आणि अति अशक्तपणा मला जाणवला. परत परत ताप येत होता. त्यामुळे मी जीएमसीला फोन केला. त्यांनी मला ओपीडीमध्ये दाखवायचे सांगितले. २ जूनला मला अ‍ॅडमिट करण्यात आले व ४ जूनला माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, असे तरुणाने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. या तरुणाच्या संदर्भात झालेल्या गलथानपणाची तक्रार पातोडे यांनी केली असून, कोरोनाच्या पृष्ठभूमिवर जिल्हा प्रशासन, सर्वोपचार रुग्णालय आणि महापालिकेतील अधिकारी गंभीर नसल्याने अकोला जिल्ह्यासाठी तातडीने तीन स्वतंत्र आयएएस अधिकारी नोडल म्हणून नेमण्यात यावे, तसेच बाधित रुग्णाला घरी पाठविल्याप्रकरणी दोषींविरोधात तातडीने कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार  कारवाई सदर रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पाच दिवस त्याला सर्वोपचार रुग्णालयातच ठेवण्यात आले होते, त्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. दरम्यानच्या काळात रुग्ण हा पीडीकेव्ही येथील संस्थागत अलगीकरणामध्ये होता. सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाने आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच रुग्णसेवा दिली; परंतु रुग्णाने पुन्हा तपासणीसाठी चुकीचे नाव सांगून नमुने दिल्याची माहिती सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाने दिली; मात्र या संदर्भात प्रशासनाकडून अधिक बोलण्यास नकार देण्यात आला .

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या