शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक आरोग्य सांभाळण्याची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 10:16 IST

नागरिकांनी सकारात्मक विचार करून निरोगी आयुष्याकडे वाटचाल करावी, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.

अकोला : गत सहा महिन्यांपासून कोरोनाने धुमाकूळ घातला असून, त्याचे मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ लागले आहेत. कोरोनामुळे दररोज होणारे मृत्यू आणि वाढती रुग्णसंख्या यामुळे नैराश्यामध्ये वाढ होत असून, त्याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी मानसिक आरोग्य जपण्याची गरज आहे. त्यासाठी नागरिकांनी सकारात्मक विचार करून निरोगी आयुष्याकडे वाटचाल करावी, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून, आपल्यालाही कोरोनाची लागण तर होणार नाही ना, या चिंतेत अनेक नकारात्मक विचार नागरिकांमध्ये निर्माण होत आहेत. त्यामुळे नैराश्याचे वातावरण निर्माण होत असून, त्याचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. या शिवाय, समाजमाध्यमांवरील चुकीच्या माहितीच्या आधारावर विविध घरगुती प्रयोग करतात. त्याचेही दुष्परिणाम दिसू लागतात. अशा परिस्थितीत मानसिक स्वस्थ्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असून, त्यासाठी आवश्यक उपाय करण्याची गरज आहे.असे जपा मानिसक आरोग्य

  • चुकीच्या माहितीपासून सावध राहा
  • खात्रीशीर माध्यमांवरूनच कोरोनाविषयी माहिती घ्या
  • काळजी वाढविणाऱ्या गोष्टींमध्ये मर्यादित वेळ घालवा
  • सोशल मीडियापासून ब्रेक
  • कोरोनाविषयी अपडेट राहणे आवश्यक आहे; मात्र खात्रीशीर स्रोतांवरच विश्वास ठेवा
  • चुकीची माहिती देणारे अकाउंट्स, हॅशटॅग्स वा फिरणारे मेसेजेस यापासून दूर राहा
  • सोशल मीडियापासून दूर राहून टीव्हीवर वेगळे काहीतरी बघा
  • किंवा पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करा

आजारातून बरे झालेल्या रुग्णांनी हे करा!जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, आजारानंतरचा स्ट्रेस, चिंता आणि डिप्रेशन मॅनेज करणे हा देखील आजारातून बरे झाल्यानंतर पुन्हा उभे राहण्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. यासाठी, कोविडमुक्त रुग्णांनी पुरेशी झोप घ्यावी. सकस, योग्य आणि पौष्टिक आहार घ्यावा. अ‍ॅक्टिव्ह राहावे ज्यामुळे स्ट्रेस कमी होण्यास मदत होते. लोकांशी बोलावे, मन शांत होण्यासाठी गाणी ऐकावीत, वाचन करावे. ब्रेन एक्सरसाइज करावेत, जेणेकरून स्मृती वाढविण्यास मदत होईल.

कोरोनामुळे अनेकांमध्ये नैराश्य वाढल्याचे दिसून येते. त्याचा परिणाम आरोग्यावरदेखील होत आहे. यापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी सकारात्मक विचार करावा. कोरोनापासून बचावासाठी खबरदारी तर घ्यावी; पण चुकीच्या माहितीमुळे घाबरून न जाता सकारात्मक विचार आणि सकस आहार घ्यावा.- डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, वैद्यकीय अधिकारी, जीएमसी, अकोला

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या