शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेताना कंत्राटी कार्यकारी अभियंता गजाआड

By admin | Updated: December 24, 2014 00:08 IST

अकोला येथील घटना; देयकाचे नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी स्वीकारले सहा हजार रुपये.

अकोला: १७ हजार रुपयांच्या देयकासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी सहा हजार रुपये लाच घेणारा सर्व शिक्षा अभियानचा कंत्राटी कार्यकारी अभियंता गजानन संपत चिपडे याला मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रेल्वे स्टेशन चौकातील एका हॉटेलमधून अटक केली. चिपडे याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अर्जदाराच्या तक्रारीनुसार, सर्व शिक्षा अभियानांतर्गत २0११ व २0१२ मध्ये बिहाडमाथा (ता. बार्शिटाकळी) येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत एक वर्गखोली बांधण्यात आली होती. त्यासाठी ३ लाख ८४ हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी तक्रारदाराला ३ लाख ६७ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले. उर्वरित १७ हजार रुपयांची रक्कम मिळाली नव्हती. ही रक्कम मिळण्यासाठी तक्रारदाराने सर्व शिक्षा अभियानातील कंत्राटी कार्यकारी अभियंता गजानन चिपडे यांच्याकडे देयक सादर केले. या देयकासाठी चिपडे यांच्या नाहरकत प्रमाणपत्राची गरज होती. हे नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांनी तक्रारदाराला सात हजार रुपयेलाचेची मागणी केली. दरम्यान, तक्रारकर्त्याने सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रेल्वे स्टेशन चौकातील एका हॉटेलमध्ये सापळा रचला. या ठिकाणी चिपडे हा आला आणि त्याने तक्रारकर्त्याकडून सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पोलीस अधिकार्‍यांनी त्याला रंगेहाथ अटक केली. आरोपीवर रामदासपेठ पोलीस ठाण्यात कलम ७, १३(१),(ड) सह १३(२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.