शहरं
Join us  
Trending Stories
1
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
2
Marathi News LIVE: सीमेवर कुंपण घालण्यासाठी बीएसएफला जमीन देण्यास पश्चिम बंगाल सरकारची मान्यता
3
हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
4
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
5
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
6
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
7
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
8
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
9
एका पेक्षा एक तगड्या खेळाडूंपासून सारं काही होतं, पण...., ही बाब ठरली मुंबईच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण
10
‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत
11
रात्रभर घराबाहेर खाटेवर झोपला, सकाळी 'पत्नी विष प्यायली' म्हणत रडला; क्रूर पतीचा 'असा' उघड झाला बनाव!
12
Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
13
मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श
14
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
15
Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
16
क्रेडिट कार्डने पैसे वाचवता येतात का? करा हजारो रुपयांची बचत; कोणते कार्ड नेमके कशासाठी वापरायचे?
17
शनि जयंती आणि शनि अमावस्या २०२६: साडेसाती-ढय्येचा त्रास संपणार! १६ मे रोजी करा 'हे' विशेष उपाय
18
'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका
19
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
20
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील १५२ इमारतींचे बांधकाम अवैध

By admin | Updated: June 5, 2014 01:32 IST

अकोला मनपाची कारवाई; १५२ इमारतींचे बांधकाम अवैध असल्यावर शिक्कामोर्तब

अकोला : शहरात अनधिकृत बांधकाम करणार्‍या तब्बल १५२ बांधकाम व्यावसायिकांना नोटीस देण्याची प्रक्रिया बुधवारी संपुष्टात आली. या प्रकरणी महापालिकेच्यावतीने पुन्हा ३८ बांधकाम व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आल्या. १५२ पैकी कोण्याही इमारतीला दुप्पट दंड आक ारून त्यांना नियमित करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे यापूर्वी आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी स्पष्ट केल्याने बांधकाम पाडण्याच्या संभाव्य कारवाईने अनेकांच्या पायाखालील वाळू सरकली आहे. बांधकाम व्यवसायामुळे शहरातील विकास कामांना चालना मिळाल्याचे कोणीही नाकारत नाही. शहराचे र्मयादित भौगोलिक क्षेत्र व आकाशाला भिडणारे जमिनीचे भाव पाहता, जागा विकत घेऊन त्यावर घर बांधण्याचे मध्यमवर्गीयांचे स्वप्न केव्हाचेच भंगले आहे. साहजिकच, नोकरपेशा वर्गाने फ्लॅट संस्कृतीला आपलेसे केले आहे. ही गरज लक्षात घेता, बांधकाम व्यावसायिकांनी रहिवासी इमारती उभारण्याचे काम हाती घेतले. शहराच्या कानाकोपर्‍यात अशा असंख्य इमारती डौलाने उभ्या असून, काही निर्माणाधिन आहेत. परंतु इमारतींचे निर्माण करताना बांधकाम नियमावलीकडे दुर्लक्ष करीत मंजूर एफएसआयपेक्षा जास्त बांधकाम करण्यात आले. ही बाब गंभीरतेने घेत, आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी अनधिकृत बांधकाम बंद करण्याची नोटीस बजावली. शहरातील १५२ निर्माणाधिन इमारतींचे मोजमाप घेण्यात आल्यानंतर संबंधित बांधकाम व्यावसायिकांना पुन्हा नोटीस पाठवल्या आहेत. शेवटच्या टप्प्यातील ३८ नोटीस बुधवारी जारी करण्यात आल्या.