शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारी मागे घेण्यासाठी मनधरणी

By admin | Updated: September 29, 2014 02:11 IST

मतांचे विभाजन टाळण्यासाठी पक्षनेतृत्वांची धडपड; स्वपक्षीयांसोबतच अपक्षांवरही लक्ष.

अकोला -विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागले ते, उमेदवारी अर्ज मागे घेणार्‍यांकडे. मतांचे विभाजन करू शकणार्‍या उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी स्वपक्षीयांसोबतच अपक्ष उमेदवारांचीही मनधरणी केली जात आहे. शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवसापर्यंत जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात १८५ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, भारिप, मनसे, बसपासह इतर पक्षांच्या उमेदारांसोबतच अपक्ष उमेदवारांचाही भरणा मोठय़ा प्रमाणावर आहे. पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे अपक्ष उमेदवारी दाखल करणार्‍या उमेदवारांवर आता सर्वच पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले आहे. बाळापूर, मूर्तिजापूर आणि अकोला पूर्व मतदारसंघात प्रामुख्याने भारिप-बमसं, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करणार्‍यांची संख्या अधिक आहे. अकोला पूर्वमध्ये काँग्रेसचे दुसर्‍या फळीतील नेते पुरुषोत्तम दातकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा इंगळे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यांनी भारिप-बमसंतर्फे या मतदारसंघातून तिकीट मागितली होती. त्यामुळे त्यांनी पक्षातर्फेही एक अर्ज दाखल केला आहे. मूर्तिजापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिभा अवचार यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. याशिवाय राकाँतर्फे अर्ज दाखल करणार्‍यांची या मतदारसंघात मोठी संख्या आहे. अकोला पश्‍चिम आणि पूर्व या दोन्ही मतदारसंघात भाजपतर्फे डॉ. योगेश साहू यांनी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात पक्षाचे अधिकृत उमेदवार असतानाही त्यांचा अर्ज आहे. याशिवाय विजय अग्रवाल यांचाही अर्ज आहे.बाळापूरमध्ये काँग्रेसने नातिकोद्दिन खतीब यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजप सोडून काँग्रेसमध्ये आलेले नारायणराव गव्हाणकर यांना लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही काँग्रेसच्या तिकिटापासून वंचित रहावे लागले. त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मूर्तिजापूरमधून भारिप-बमसंने राहुल डोंगरे यांना एबी फॉर्म दिला. असे असतानाही तब्बल इतर पाच उमेदवारांनी येथून भारिप-बमसंतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. यात श्यामराव वाहुरवाघ, संजय मुळे, संदीप दौलतराव सरनाईक, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र गोपकर आणि भाऊराव सुरडकर यांचा समावेश आहे. गोपकर यांनी अपक्ष म्हणूनही उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याने त्यांची उमेदवारी कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ** अपक्ष ठरणार अडचणीचे!स्वपक्षीय उमेदवारांसोबतच मतदारसंघातील जातीय समीकरणामध्ये अडचणीच्या ठरणार्‍या तुल्यबळ अपक्ष उमेदवारांवर सर्वच पक्षांच्या उमेदवारांचे विशेष लक्ष आहे. त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी म्हणून सर्वच मार्गांनी प्रयत्न सुरू झाले आहेत. १ ऑक्टोबर ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने तोपर्यंत त्यांची मनधरणी सुरू राहील.** मराठा समाजाच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यताआकोट आणि अकोला पूर्व या दोन्ही मतदारसंघात मराठा-कुणबी समाजातील उमेदवारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात मराठा समाजाची मतं विभागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मतांचे विभाजन होऊ नये म्हणून सर्वच पक्षांचे उमेदवार कामाला लागले आहेत.