शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

चलनबंदीचा रब्बी पेरणीवर परिणाम!

By admin | Updated: November 19, 2016 01:59 IST

व-हाडात केवळ ५१ टक्के पेरणी, हरभरा पेरणीचे दिवस संपले!

राजरत्न सिरसाटअकोला, दि. १८- एक हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बंद झाल्यानंतर उद्भवलेल्या कृत्रिम पैसेटंचाईचा परिणाम रब्बी पेरणीवर झाला असून, पश्‍चिम विदर्भात (वर्‍हाड) केवळ ५१ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. १७ नोव्हेंबर रोजी केंद्रीय आर्थिक व्यवहार सचिवांनी एका आदेशान्वये शेतकर्‍यांना २५ हजार रुपये रक्कम देण्याची सूचना बँकांना केली आहे; पण याअगोदरच वर्‍हाडातील हरभरा पेरणीचा हंगाम संपला आहे. गहू पेरणीही शेवटच्या टप्प्यात आहे.नोटा चलनबंदीनंतर शेतकर्‍यांकडे रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी पैसाच मिळाला नाही. ज्या शेतकर्‍यांनी ९ नोव्हेंबरच्या अगोदर पेरणीचे नियोजन केले होते, त्यांनी हरभरा, गहू पिकांची पेरणी केली; पण पेरणीनंतर त्या शेतकर्‍यांकडेही रासायनिक खतासाठी पैसा नसल्याने त्यांची ससेहोलपट सुरू आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने वर्‍हाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांसाठी कृषी विभागीय कार्यालयाने अतिरिक्त रब्बी पिके पेरणीचे नियोजन केले होते. सरासरी क्षेत्रापेक्षा चार लाख जास्त म्हणजे ९ लाख ७४ हजार १00 हेक्टरवर रब्बीची पेरणी केली जाणार होती. प्रत्यक्षात या पाच जिल्ह्यात मूळ सरासरी क्षेत्राच्या ५१ टक्के म्हणजे २ लाख ८४ हजार १00 हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे.वर्‍हाडात कोरडवाहू हरभरा पीक सर्वाधिक घेतले जाते. यावर्षी त्यासाठी अनुकूल स्थिती होती; पण पैसे आणि बियाण्यांच्या आलेल्या अडचणीमुळे केवळ २८४ हजार ८00 हेक्टरवरच शेतकर्‍यांना हरभरा पिकांची पेरणी करता आली. कोरडवाहू हरभरा पेरणीचा हंगाम १५ नोव्हेंबरपर्यंतच होता. गहू पिकांची पेरणीदेखील २८ हजार ८00 हेक्टरवर झाली आहे. कोरडवाहू गहू पेरणीचा हंगाम संपत आला आहे. ज्या शेतकर्‍यांकडे सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था आहे, त्यांना डिसेंबरच्या प्रथम आठवड्यापर्यंत पेरणी करता येईल; पण पैसाच हातात नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.अकोला जिल्हय़ात रब्बी पेरणीचे उद्दिष्ट १ लाख २६ हजार ६00 हेक्टर होते. प्रत्यक्षात २९,१00 हेक्टरवरच पेरणी झाली आहे. बुलडाणा जिल्हय़ाच्या २ लाख ५ हजार ८00 हेक्टरपैकी ७५ हजार ३00 हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली. वाशिम जिल्हय़ातील १ लाख ३0 हजार २00 हेक्टरपैकी २९,९00 हेक्टर, अमरावती जिल्हय़ातील २ लाख २९ हजार २00 पैकी ६६,८00 हेक्टर तर यवतमाळ जिल्हय़ातील २८३ हजार ३00 हेक्टरपैकी ८३ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. दरम्यान, रब्बी ज्वारी ८,९00, मका पाच हजार हेक्टरसह इतर पिकांची तुरळक पेरणी झाली आहे.

- शेतकर्‍यांच्या हातात पैसाच नसल्याने विदर्भात रब्बी पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. शेतकर्‍यांना शेतं कोरडी ठेवावी लागली.डॉ. शरद निंबाळकर,माजी कुलगुरू , डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.- कोरडवाहू हरभरा पेरणीचा काळ संपला आहे. गहू पेरणीही अंतिम टप्प्यात आहे. ज्यांच्याकडे मुबलक सिंचनाची सोय आहे, ते या आठवड्यात गहू व हरभरा पेरणी करू शकतात.डॉ. ए.एन. पाटील,विभाग प्रमुख,कडधान्य संशोधन विभाग,डॉ.पंदेकृवि,अकोला.