रेल्वे भाडेवाढीविरुद्ध कॉँग्रेसचे आंदोलन

By Admin | Updated: June 22, 2014 01:55 IST2014-06-22T01:53:31+5:302014-06-22T01:55:46+5:30

गांधी चौकात रास्ता रोको: मध्यवर्ती बस स्थानकाजवळ निदर्शने

Congress's movement against rail fare | रेल्वे भाडेवाढीविरुद्ध कॉँग्रेसचे आंदोलन

रेल्वे भाडेवाढीविरुद्ध कॉँग्रेसचे आंदोलन

अकोला : रेल्वे भाडेवाढीविरोधात कॉँग्रेसने शनिवारी ठिकठिकाणी आंदोलन केले. आंदोलनात केंद्रातील एनडीए सरकारने केलेल्या रेल्वे भाडेवाढीचा निषेध करण्यात आला.
शुक्रवारी रेल्वे प्रवासी भाड्यात १४.२ तर मालवाहू भाड्यात ६.५ टक्के दरवाढ करण्यात आली. या दरवाढीचा राजकीय पक्षांनी विरोध करीत केंद्र सरकारवर टीका केली. रेल्वे भाडेवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढणार असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
दरम्यान, भाडेवाढीच्या विरोधात कॉँग्रेसने गांधी चौकात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारने केलेल्या भाडेवाढीचा निषेध करण्यात आला. आंदोलनात कॉँग्रसचे महानगराध्यक्ष मदन भरगड, माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, विष्णू मेहरे, सुधीर ढोणे, माजी आमदार बबनराव चौधरी, सीमा ठाकरे, निखिलेश दिवेकर, अनुप खरारे, गणेश कटारे, अभिषेक कोकाटे,राजेश पाटील, सचिन गिरी, सिमा ठाकरे, रमेश मोहोकार, देवीदास सोनोने, कैलास देशमुख, संजय मेश्रामकर, सुरेश ढाकोलकर, कृष्णा मोरे, लक्ष्मण कडू, दिनेश खोब्रागडे, शेख बबलू, इस्माईल ठेकेदार, महेबूब खान, उमा शर्मा, जावेद खान, तश्‍वर पटेल, अब्दुल गणी, आदी सहभागी झाले होते. दरम्यान, युवक कॉँग्रेसने रेल्वे दरवाढीच्या विरोधात शनिवारी स्वराज्य भवनापासून गाढव मिरवणूक काढली. मिरवणुकीदरम्यान मदनलाल धिंग्रा चौकात भाववाढीचा निषेध करण्यात आला.

Web Title: Congress's movement against rail fare