शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महागाईच्या मुद्यावर काँग्रेसचे पर्दाफाश आंदोलन

By admin | Updated: August 29, 2015 00:15 IST

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पर्दाफाश आंदोलन करण्यात आले.

अकोला : 'अच्छे दिन'चे आश्‍वासने देत सत्तापक्षात बसलेल्या मोदी सरकारने जनतेची थट्टा केल्याचा आरोप करीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पर्दाफाश आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय चौकात पुतळा दहन करण्याचा प्रकार प्रथमच करण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात शुक्रवारी राज्य स्तरावर मोदी सरकारविरोधी पर्दाफाश आंदोलन करण्यात आले. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान जनतेला पारदर्शक सरकारचे आश्‍वासन देणार्‍या मोदी सरकाने जनतेची थट्टा केली असून, पंतप्रधान विदेश दौर्‍यांमध्ये व्यस्त असल्याची घोषणाबाजी करण्यात आली. वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकर्‍यांच्या आत्महत्या आदी विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.या नंतर काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय चौकात पंतप्रधान मोदी तसेच महागाईच्या प्रतीकात्मक पुतळ्य़ाचे दहन करीत घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलनादरम्यान पुतळा दहनाची ही पहिलीच घटना असल्याने याकडे सर्वांचे लक्ष आकर्षित झाले. उपस्थित काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शेतकर्‍यांच्या समस्या, जनावरांच्या चारा-पाण्याच्या तसेच वाढत्या महागाईच्या मुद्यावर सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण) चे अध्यक्ष हिदायत पटेल, मदन भरगड, सुधाकर गणगणे, लक्ष्मण तायडे, बाबाराव विखे पाटील, हेमंत देशमुख, महेश गणगणे, साजिद खान पठाण, अजहर हुसेन, रमाकांत खेतान, अनंत बगाडे, राजू चितलांगे, राजेश भारती, विष्णू मेहरे, कपिल रावदेव, प्रदीप वखारिया, उषा विरक, राजेश पाटील, राजेंद्र चितलांगे यांची तसेच महिला काँग्रेसच्या साधना गावंडे, डॉ. वर्षा बडगुजर, उषा विरक, स्वाती देशमुख, सीमा ठाकरे, पुष्पा गुलवाडे, मोहिनी मांडलेकर, सुनीता धुरंधर, स्वाती देशमुख, नंदा मानकर, जयश्री देशमुख, संजीवनी बिहाडे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते.