शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार करताय, आधी नियमांची पूर्तता करा!

By admin | Updated: January 3, 2015 01:27 IST

अकोला मनपाचा निर्णय; नागरिकांचा आखडता हात

आशिष गावंडे / अकोलाप्रभागातील अवैध बांधकाम असो वा नाल्या-सर्व्हिस लाइन, बंद पथदिवे किंवा रस्ते साफसफाईची समस्या, ती दूर करण्यासाठी नागरिक मनपाकडे तक्रारी करतात. यापुढे मात्र अशा तक्रारी करताना संबंधिताना दहावेळा विचार करावा लागेल. आधी नियमांची पूर्तता करा, त्यानंतरच तक्रारींची दखल घेतल्या जाईल,अशा स्वरूपाची नियमावलीच मनपाने जारी केली आहे. नियमावली पाहून अकोलेकरांनी आखडता हात घेतल्याची परिस्थिती आहे.अकोलेकरांना नियमित पाणीपुरवठा, पथदिव्यांची सुविधा, नाल्या-सर्व्हिस लाइनची दैनंदिन साफसफाई, रस्त्यांची झाडपूस, पायी चालण्यासाठी फुटपाथ व प्रशस्त रस्ते आदी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे. नियमित मालमत्ता कर, पाणीपट्टीसह मनपाच्या इतर नियमांची पूर्तता करून कर जमा करण्याची नैतिक जबाबदारी अकोलेकरांचीसुद्धा आहे. शहरात १ लाख ३0 हजारपेक्षा जास्त मालमत्ताधारकांची मनपाकडे नोंद आहे. यामधील अवघे ३५ ते ४0 हजार मालमत्ताधारक मनपाचे दायित्व अदा करतात. परिणामी प्रशासनाला पुरेसे उत्पन्न प्राप्त होत नसल्याने मूलभूत सोयी-सुविधा पुरविताना प्रशासनाची दमछाक होते. साहजिकच शहरात समस्या निर्माण होतात. नागरिकांना भेडसावणार्‍या तक्रारींचे निरसन करण्यात नगरसेवक अपयशी ठरल्यानंतर मनपाकडे धाव घेतल्या जाते. यातही अवैध बांधकामाच्या तक्रारी क्लिष्ट स्वरूपाच्या असतात. यावर तोडगा न निघाल्यास तक्रारींचा महापूर साचतो. यावर उपाय म्हणून मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी तक्रारींचे निरसन करण्यापूर्वी नागरिकांनी मनपाच्या नियमांची पूर्तता करण्यासाठी एक नियमावलीच जारी केली. यामध्ये अर्जदाराचे नाव, तक्रारीचे स्वरूप, चालू वर्षाचा मालमत्ता कर-पाणीपट्टी जमा केल्याचा गोषवारा, तसेच घर बांधकामाची परवानगी व परवानगीचा क्रमांक, दिनांक नमूद करण्याचा समावेश आहे. नळ कनेक्शन असल्यास परवानगी क्रमांक, दिनांक व अवैध असल्यास वैधतेकरिता प्रयत्न केले काय, इमारतीमध्ये अग्निशमनची व्यवस्था केली काय आदी माहिती देणे बंधनकारक करण्यात आले. तक्रार स्वीकारण्याची जबाबदारी क्षेत्रीय अधिकार्‍यांवर सोपवण्यात आली. मनपाने जारी केलेली नियमावली लक्षात घेता, संबंधित व्यक्तीने नियमांची पूर्तता केली असेल तरच तक्रारीला प्राधान्य दिले जाईल, असे दिसून येते. या नियमावलीमुळे मागील काही दिवसांत मनपाकडे तक्रारींचा खच कमी झाल्याची माहिती आहे.