शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल थेट बाजारात विकणार !

By admin | Updated: September 28, 2014 01:54 IST

राज्याच्या उपक्रमानंतर केंद्र शासनाचा पुढाकार.

अकोला : उत्पादक ते ग्राहक या साखळीमधील मध्यस्थांची संख्या कमी करू न शेतकर्‍यांना त्यांच्या मालाचा योग्य दाम मिळावा, यासाठी शहरी भागाला भाजीपाला पुरवठा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, शेतकरी उत्पादक गट तथा समुहाकडील भाजीपाला स्थायी व फिरत्या विक्री केंद्रामार्फत ग्राहकांपर्यत पोहोचविला जाईल. यासाठी शेतकरी उत्पादक गटानां अनुदानही दिले जाणार आहे.शासनाने राज्यात उत्पादक ते थेट ग्राहक भाजीपाला, धान्य व्रिकी योजना राबविली आहे; परंतु र्मयादित स्वरूपाच्या या योजनेला व्यापक स्वरू प देण्यासाठी केंद्र शासनाने या प्रकल्पाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. शेतकर्‍यांना त्यांनी उत्पादीत केलेल्या मालाला योग्य भाव मिळावा, हा उद्देश यामागे असला तरी ग्राहकांना वाजवी दरामध्ये उच्च प्रतिचा व ताजा भाजीपाला उपलब्ध करू न देण्याची व्यवस्था करणे; हादेखील या प्रकल्पामागचा मुख्य उद्देश आहे.या प्रकल्पातंर्गत उत्पादक शेतकरी गट, शेतकरी उत्पादक समूह किंवा या गटांनी पुरू स्कृत केलेला लघू विक्री व्यावसायिक, अँग्रीकेटर्स म्हणून मान्यतप्राप्त व्यक्ती किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या फ्रेंचायजी, उद्योजक व्यक्ती, सहकारी संस्था, स्वंयसहायता गट, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील नोंदणीकृत कंपन्यांना अनुदान दिले जाणार आहे. या सर्व विक्रेत्यांना शहरी भागासाठी या प्रकल्पातंर्गत भाजीपाला विक्री करता येईल. या प्रकल्पातंर्गत स्थायी व फिरत्या विक्री केंद्राला खर्चाच्या ५0 टक्के किंवा कमाल पंधरा हजार रूपये इतके अनुदान दिले जाणार आहे. स्वत:च्या जागेत स्थायी विक्री केंद्र बांधायचे असेल, तर त्यांना शितगृहाच्या सुविधेसह चार लाखाचे अनुदान दिले जाईल. भाड्याच्या जागेत हे विक्री केंद्र उभारायचे असल्यास त्यांना दोन लाखापर्यंत अनुदान देय असून, (मेटोराईज्ड व्हेंडीग कार्ट) फिरते वाहन विक्रीसाठी दोन लाखाचे अनुदान दिले जाणार आहे. यातील काही प्रकल्पांसाठी दहा लाखापर्यत अनुदान मिळणार आहे. यासाठी शेतकरी उत्पादक गट, शेतकरी उत्पादक समुहाला यासाठीचे अर्ज उपलब्ध करू न देण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे शेतकर्‍यांना आपला उत्पादीत माल मोठे हॉटेल्स, बाजार व इतर ठिकाणी थेट विकता येणार आहे.