शहरं
Join us  
Trending Stories
1
Diwali Muhurat Trading 2025: शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
2
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
3
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
4
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
5
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
6
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
7
"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!
8
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
9
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
10
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
11
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
12
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
13
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
14
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
15
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
16
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
17
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
18
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
19
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
20
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...

धूळमुक्त शहरासाठी समिती गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 12:46 IST

शहर धूळमुक्त करण्यासाठी विविध विभागाच्या अधिकाºयांची समितीही गठित केली. ही समिती आता त्यासाठी काम करणार आहे.

अकोला: प्रदूषणाचे प्रमाण प्रचंड असलेल्या राज्यातील १८ शहरांमध्ये अकोल्याचाही समावेश असल्याचे ‘लोकमत’ने सातत्याने मांडले. पालकमंत्री बच्चू कडू यांनीही दखल घेतली. ही बाब पुन्हा २३ जानेवारीच्या अंकात उमटताच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. शहर धूळमुक्त करण्यासाठी विविध विभागाच्या अधिकाºयांची समितीही गठित केली. ही समिती आता त्यासाठी काम करणार आहे.अकोला शहरातील धूळ तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्याचे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने दिलेले आहेत. त्या प्लॅननुसार काम करण्याची जबाबदारी महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. तरीही या दोन्ही यंत्रणांकडून त्याबाबत कोणत्याच उपाययोजनांना सुरुवात झाली नाही. पालकमंत्री कडू यांनी १५ जानेवारी रोजी अधिकाºयांना धारेवर धरले होते. धुळीबाबत काहीच न झाल्याने ‘लोकमत’ने २२ जानेवारी रोजी वृत्त प्रसिद्ध केले. त्यावर जिल्हाधिकारी पापळकर यांनी संबंधित विभागांची बैठक तातडीने बोलावली. या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब झाल्टे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता दिनकर नागे, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना उपअभियंता राजेंद्र धिनमिने, मनपा उपायुक्त वैभव आवारे, मनपा कार्यकारी अभियंता अजय गुजर, जान्डू कन्स्ट्रक्शनचे एम. एस. चंदनबटवे उपस्थित होते.

- समितीमध्ये या अधिकाºयांचा समावेशधूळमुक्त शहर समितीमध्ये अध्यक्ष म्हणून महापालिकेचे सहायक आयुक्त, उपाध्यक्ष- पोलीस उपनिरीक्षक, सदस्य सचिव म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी, सदस्यांमध्ये निवासी नायब तहसीलदार, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता, महापालिका बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) मनपा, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचा समावेश आहे.

- उपाययोजनांचा अहवाल मागविला!शहरात जेथे रस्ते, अन्य विकास कामे सुरू आहेत. त्या संबंधित ठेकेदाराने धूळ नियंत्रणाबाबत उपाययोजना कराव्या, यासंदर्भात प्रत्यक्ष कामाचे ठिकाणनिहाय अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे निर्देश देण्यात आले. जेथे रस्त्याचे मुरूम पसरविण्याचे काम सुरू असेल, तेथे पाण्याचा शिडकावा करावा, वळण रस्त्यांचे डांबरीकरण करावे, त्यामुळे धुळीचा उद्भव कमी होईल, असेही बैठकीत सांगण्यात आले.फोटो : अकोला : जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला उपस्थित अधिकारी.

 

टॅग्स :Akolaअकोलाair pollutionवायू प्रदूषण