चतारी येथे पाठलाग करून मुरुमाचा ट्रॅक्टर पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:14 IST2021-02-05T06:14:48+5:302021-02-05T06:14:48+5:30

नायब तहसीलदार सय्यद एहसानोद्दीन २६ जानेवारी रोजी खेट्री, पिंपळखुटा, पहाडसिंगी, शिरपूर, चांगेफळ, परिसरात गस्तीवर असताना, चतारी परिसरात मुरुमाने भरलेला ...

Chased at Chatari and caught Muruma's tractor | चतारी येथे पाठलाग करून मुरुमाचा ट्रॅक्टर पकडला

चतारी येथे पाठलाग करून मुरुमाचा ट्रॅक्टर पकडला

नायब तहसीलदार सय्यद एहसानोद्दीन २६ जानेवारी रोजी खेट्री, पिंपळखुटा, पहाडसिंगी, शिरपूर, चांगेफळ, परिसरात गस्तीवर असताना, चतारी परिसरात मुरुमाने भरलेला ट्रॅक्टर आढळून आला. ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला असता, चालकांनी ट्रॅक्‍टर घेऊन पळ काढला. परंतु नायब तहसीलदारांनी शासकीय वाहनाने पाठलाग करून ट्रॅक्टर पकडला. ट्रॅक्टर मालकावर दंडात्मक कारवाई होईपर्यंत ट्रॅक्टर चान्नी पोलिसांच्या ताब्यात दिला. तसेच चतारी परिसरातील गेल्या काही दिवसांपासून शासकीय जागेतून जेसीबी मशीनद्वारे मुरुमाचे उत्खनन करून सर्रास अवैध वाहतूक सुरू आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने मुरूम व रेतीमाफियांची मुजोरी वाढत आहे.

राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप

मुरुमाचे उत्खनन करून अवैध वाहतूक करताना ट्रॅक्टर पकडल्यावर, कारवाई टाळण्यासाठी काही राजकीय पुढाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो प्रयत्न अयशस्वी ठरला.

ज्या ठिकाणी मुरुमाचे उत्खनन करून अवैध वाहतूक होत असल्यास, त्या परिसराची पाहणी करून कारवाई करण्यात येईल, तसेच रेती वाहतूक करताना अनेक कारवाई करण्यात आल्या आहेत.

दीपक बाजड तहसीलदार पातूर

मुरुम व रेतीमाफियांना अभय कुणाचे|

पातूर तालुक्यातील ग्रामीण भागात मुरुम व रेतीचे उत्खनन करून अवैध वाहतूक सर्रास सुरू आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचे चित्र आहे. मुरुम व रेतीमाफियांना अभय कोणाचे आहे, असा प्रश्न परिसरातील ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

Web Title: Chased at Chatari and caught Muruma's tractor