शहरं
Join us  
Trending Stories
1
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
2
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
3
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
7
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
8
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
9
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
10
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
11
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
12
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
13
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
14
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
15
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
16
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
17
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
18
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
19
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
20
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पध्दतीनेच होणार बदल्या; पोलिसांना मिळणार स्थिरता

By admin | Updated: May 28, 2014 23:39 IST

किमान सहा वर्षे तरी एकाच ठिकाणी राहता येणार असल्याने पोलीस कर्मचार्‍यांबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांनीही सुटकेचा निश्‍वास सोडला आहे.

वाशिम : पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस शिपाईपासून सहायक पोलीस उपनिरीक्षकांच्या दर दोन वर्षांनी बदल्या करण्याचे धोरण राज्य शासनाने अवलंबले होते. मात्र, यामध्ये सुधारणा केली आहे. यामुळे किमान सहा वर्षे तरी एकाच ठिकाणी राहता येणार असल्याने पोलीस कर्मचार्‍यांबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांनीही सुटकेचा निश्‍वास सोडला आहे. पोलीस दलात कार्यरत असलेले शिपाई ते सहायक उपनिरीक्षक यांना एकाच गावात जास्त दिवस न ठेवता दर दोन वर्षांला त्यांची बदली करण्याचे धोरण राज्य शासनाने अवलंबले होते. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मध्ये महाराष्ट्र पोलीस (सुधारणा) अद्यादेश २0१४ अन्वये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यात बदल्यांबाबत सुधारणा करण्यात आली. पूर्वीप्रमाणेच सहा वर्षांतून बदली करण्याचा अध्यादेश आणि सुधारणा करण्याचा शासनाचा विचार आहे. त्यामुळे पोलीस कर्मचार्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. महाराष्ट्र पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्यांबाबत सर्वसाधारण धोरण निश्‍चित करण्यात आले होते. पोलीस शिपायांच्या प्रथम नेमणुकीनंतर प्रशिक्षण व मुख्यालय येथील तीन वर्षांची विहित सेवा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची मुख्यालयातून इतर ठिकाणी बदली करण्यात येईल. ज्या पोलीस कर्मचार्‍यांना एका पोलीस ठाण्यात दोन वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झाला असेल तर प्रशासकीय दृष्टिकोनातून शक्य असल्यास त्यांची त्याच उपविभागातील परिमंडळातील दुसर्‍या पोलीस ठाण्यात बदली करण्यात येईल. उपविभाग किंवा परिमंडळात चार वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यास व सध्याच्या ठिकाणी दोन वर्षे पूर्ण होत असतील तर त्यांच्या अन्य पोलीस ठाणे, मुख्यालय, घटक शाखा या ठिकाणी बदल्या करण्यात येईल. अशा पद्धतीने शासनाने ७ एप्रिल २0१४ रोजी अध्यादेश पाठविला होता. त्यामुळे पोलीस शिपाई व अधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली होती. अशा पद्धतीने जर दोन वर्षांला पोलीस खात्यात बदली झाली असती तर मुलांचे शैक्षणिक नुकसान होत होते. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मध्ये सुधारण अद्यादेश २0१४ नुसार बदल्यांमध्ये सुधारणा केली करण्यात आलेली आहे. तसेच या अद्यादेशात काही दुरुस्ती करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे या सुधारणा मिळेपयर्ंत केवळ पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या यापूर्वीच्याच धोरणानुसार अस्तित्वात असलेल्या नियमांची कार्यपद्धतीनुसार करण्यात यावी, असे आदेश पोलीस महासंचालक (आस्थापना) महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी शासनाला आदेश दिले आहेत.त्यामुळे दोन वर्षांच्या बदलीबाबत सध्यातरी स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे पोलीस कर्मचारी, कुटुंबीयांमध्ये जुन्याच पध्दतीने बदल्या होणार असल्याने व यामुळे पाल्यांचे शिक्षणाबाबत अडचणी येणार नसल्याने एकंदरीत समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे