शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

प्लाझ्मा दान करून केला पत्नीचा वाढदिवस साजरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 5:58 PM

प्लाझ्मा दान करून पत्नीचा वाढदिवस साजरा केल्याची ही राज्यातील बहुदा पहिलीच घटना असावी, असा दावा संघदास वानखडे यांनी केला.

अकोला : कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याच्या पृष्ठभूमीवर सगळीकडे नकारात्मक वातावरण असताना कोरोनाची बाधा झालेल्या एका शिक्षकाने कोरोना रुग्णांवर उपचारासाठी उपयुक्त असलेल्या प्लाझ्मा थेरपीसाठी स्वत:चा प्लाझ्मा रक्तघटक दान करून त्यांच्या पत्नीचा वाढदिवस साजरा केल्याची सकारात्मक बाब बुधवारी पुढे आली. संघदास व भारती वानखडे असे या दाम्पत्याचे नाव आहे.मुर्तीजापूर तालुक्यातील खडका येथील शाळेत शिक्षक संघदास वानखडे व त्यांच्या पत्नी भारती यांना गत महिन्यात कोरोनाची बाधा झाली होती. या दाम्पत्याने कोरोनाशी यशस्वी लढा दिल्यानंतर प्लाझ्मा दान करण्याचे ठरविले होते. परंतु प्लाझ्मा दान करणे धोकादायक आहे, असे काहींनी सांगितल्यामुळे संघदास वानखडे हे द्विधा मन:स्थितीत होते. त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीचे डॉ. श्रीराम चोपडे यांच्याशी संपर्क साधून प्लाझ्मा दान करण्याचा मनोदय व्यक्त केला. परंतु, कोरोनातून बरे होऊन २८ दिवस होणे गरजेचे असल्याने त्यावेळी त्यांनी नकार दिला. दरम्यानच्या काळात संघदास वानखडे हे रक्तपेढीच्या संपर्कात होते. शेवटी २३ सप्टेंबर या त्यांच्या पत्नीच्या वाढदिवसाला प्लाझ्मा दान करण्याचे निश्चित झाले. त्यानूसार बुधवारी सकाळीच वानखडे दाम्पत्य सर्वोपचार रुग्णालयातील रक्तपेढीत आले. तेथे आवश्यक सोपस्कार पार पडल्यानंतर त्यांचा प्लाझ्मा घेण्यात आला. श्रीराम चोपडे (रक्तपेढी प्रमुख), तपस्या भारती (रक्तसंक्रमण अधिकारी प्रमुख), आशिष शिंदे (सहाय्यक प्राध्यापक), हेमंत मातुरकर (रक्तपेढी तंत्रज्ञ), अंकुश जमदाडे (कर्मचारी) यांचे सहकार्य मिळाले. प्लाझ्मा दान करून पत्नीचा वाढदिवस साजरा केल्याची ही राज्यातील बहुदा पहिलीच घटना असावी, असा दावा संघदास वानखडे यांनी केला.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या