शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’मुळे ‘सीसीआय’ची कापूस खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 11:34 IST

कापूूस खरेदीही बंद करण्यात आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

अकोला : कोरोनाचा प्रभाव सर्वच क्षेत्रावर झाला असून, खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने आठ दिवसांपूर्वी कापूस खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोेपाठ भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय)ने कापूस खरेदी केंद्रे बंद केली आहेत. राज्यात यावर्षीची शासकीय हरभरा खरेदी केंद्रे सुरू केलीच नाहीत. तूर, सोयाबीन व इतर धान्य खरेदी अगोदरच बंद करण्यात आली आहे. आता कापूूस खरेदीही बंद करण्यात आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.‘सीसीआय’ने राज्यात ८३ शासकीय कापूस खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. आजमितीस ९३ लाख क्ंिवटल कापूस खरेदी केला असून, खरेदी केंद्र सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा ‘लॉकडाऊन’ घोषित केल्यानंतर ‘सीसीआय’नेदेखील कापूस खरेदी बंद केली आहे. तत्पूर्वी सीसीआयची कापूस खरेदी केंद्रे सुरूच राहतील, असा निश्चय सीसीआयने केला होता.पणन महासंघाने राज्यात ७४ कापूस खरेदी केंद्रे सुरू केली होती. तसेच १२३ जिनिंग, प्रेसिंग फॅक्टरीत कापूस खरेदी करण्यात येत होता. पणन महासंघाने यावर्षी ५२ लाख ५९ हजार क्ंिवटल कापूस खरेदी केला आहे. यापोटी राज्यातील २ लाख ६५७ हजार शेतकऱ्यांना २ हजार ४८७.४५ कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आले आहेत. ३०० कोटींच्यावर चुकारे थकले आहेत. हे चुकारे शेतकºयांना देण्यात येत असल्याची माहिती पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी दिली. ‘एपीएमसी’ बंद करण्यात आल्याने आम्हाला कापूस खरेदी बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. आतापर्यंत ८४ लाख क्विंटल कापूस राज्यातून खरेदी केला आहे. शेतकºयांना चुकारे करण्यात येत आहेत.- डॉ. अल्लीराणी,सीएमडी,सीसीआय,मुंबई.

 

टॅग्स :Akolaअकोलाcottonकापूस