A car accident, one youth killed, four seriously injured | भरधाव कार झाडावर आदळली, युवक ठार, चार गंभीर
भरधाव कार झाडावर आदळली, युवक ठार, चार गंभीर

ठळक मुद्दे सुकळी फाट्यासमोर कार झाडावर आदळली. चेतन दिनकराव झामरे रा.रोहनखेड असे मृतक युवकाचे नाव आहे.येवदा पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेउन पंचनामा केला.


हिंगणी बु/ रोहणखेड(अकोला) : भरधाव कार झाडावर आदळल्याने २७ वर्षीय युवक जागीच ठार झाला. ही घटना १७ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सुकळी फाट्यासमोर घडली. चेतन दिनकराव झामरे रा.रोहनखेड असे मृतक युवकाचे नाव आहे.
रोहणखेड येथील चेतन झामरे हे पत्नी व दोन नातेवाईकांसह कार क्र.एमएच ३० एझेड ७४९२ ने दर्यापूरकडे जात होते. दरम्यान, सुकळी फाट्यासमोर कार झाडावर आदळली. झाडावर आदळल्याने कारने तीन ते चार वेळा उलटली. यामध्ये चालक चेतन झामरे हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी व इतर दोन नातेवाईक गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच येवदा पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेउन पंचनामा केला. तसेच जखमींना तातडीने सर्वाेपचार रुग्णालय अकोला येथे दाखल करण्यात आले आहे. (वार्ताहर)


Web Title: A car accident, one youth killed, four seriously injured
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.