कत्तलीसाठी नेण्यात येत असलेले बैल पकडले

By Admin | Updated: July 18, 2015 01:48 IST2015-07-18T01:48:11+5:302015-07-18T01:48:11+5:30

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

The bull that was taken for the slaughter was caught | कत्तलीसाठी नेण्यात येत असलेले बैल पकडले

कत्तलीसाठी नेण्यात येत असलेले बैल पकडले

अकोला - डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार बैलांना कत्तलीसाठी नेण्यात येत असताना स्थानिक गुन्हे शाखेने चारही बैलांची गुरुवारी रात्री सुटका केली. यावेळी एका आरोपीस अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुने शहरातील रहिवासी शेख इद्रीयास हा चार बैलांना गुरुवारी रात्री कत्तलीसाठी नेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील काही पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी सदर इसमास रोखले. त्याला बैलांची माहिती विचारली असता त्याने पोलिसांना उत्तर देण्यास टाळाटाळ केली. बैलांची पाहणी केली असता चारही बैलांचा एक पाय बांधलेला असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या निदर्शनास आले. त्यांनी आरोपी शेख इद्रीयास याची कसून चौकशी केली असता आरोपीने चारही बैल कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची कबुली पोलिसांना दिली. यावरून शेख इद्रीयास याच्याविरुद्ध डाबकी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख जितेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनात साहाय्यक पोलीस निरीक्षक पी. एल. झोडगे, नरेंद्र चर्‍हाटे, सुलतान पठाण, सुनील टोपकर यांनी केली. सदर चारही बैल गोरक्षण रोडवरील गोरक्षण संस्थेमध्ये पाठविण्यात आले आहेत.

Web Title: The bull that was taken for the slaughter was caught