शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘बीटी’वर बोंडअळय़ांच्या प्रतिकारक्षम पिढय़ांचा वाढला धोका!

By admin | Updated: July 14, 2014 01:23 IST

बीटी कपाशीवरील बोंडअळी प्रतिकारक्षमता वाढली असून, या कापसाच्या उत्पादनावर त्याचे प्रतिकूल परिणाम होत असल्याचे निष्कर्ष विदेशी कृषी शास्त्रज्ञांनी काढले आहेत.

अकोला : बीटी कपाशीवरील बोंडअळी प्रतिकारक्षमता वाढली असून, या कापसाच्या उत्पादनावर त्याचे प्रतिकूल परिणाम होत असल्याचे निष्कर्ष विदेशी कृषी शास्त्रज्ञांनी काढले आहेत. (रेफ्युजी) बिगर बीटीची पेरणी केल्यास मात्र या बोंडअळीला व त्यांच्या भावी पिढीला प्रतिबंध घालता येऊ शकतो, असे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे मत आहे. बीटी कापसाचे उत्पादन घ्यायचे असेल तर, त्यासोबत बिगर बीटी (रेफ्युजी) बियाणे शेताच्या बांधावर पेरणी करणे अत्यंत आवश्यक आहे. तथापि, अमेरिका, चीन या प्रगत देशातील काही भागातील शेतकर्‍यांनी बिगर बीटीचा वापरच केला नसल्यामुळे त्या भागात बोंडअळ्य़ांच्या प्रतिकारक्षम पिढय़ा निर्माण झाल्या असून, त्याचा परणिाम सरळ कापूस उत्पादनावर होत आहे. त्यामुळे या अळींच्या व्यवस्थापनासाठीचा खर्चसुद्धा वाढला आहे. विदेशी शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासातून हे निष्पन्न झाले आहे. भारतात आतापर्यंंत नैसर्गिकरित्या या अळ्य़ांचे व्यवस्थान होत आले आहे; परंतु या अळ्य़ांची वाढत चाललेली प्रतिकारक्षमता बघता भारतीय कृषी शास्त्रज्ञांपुढे हे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.सन २00२ मध्ये भारतात केवळ ५0 हजार हेक्टर क्षेत्रावर बीटी कापसाची लागवड केली जात होती. आजमितीस हे क्षेत्र ८0 ते ८५ टक्के वाढले आहे. सहा महिन्याचे हे पीक आहे. त्यामुळे या एका हंगामात कापसावर या हिरव्या बोंडअळीच्या ४ ते ६ पिढय़ा उपजीविका करतात, असा अंदाज कृषी शास्त्रज्ञांनी काढला आहे. भारतात सन २00२ पासून बीटी कापसाचा पेरा केला जात आहे. त्यामुळे या अळ्य़ांना बीटी कापसावर जगण्याची सवय होऊ लागली आहे. म्हणूनच काही विशिष्ट भागात बीटी कापसावर शेतकर्‍यांना जिवंत अळ्य़ा दिसत असून, त्यांचा काही प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला आहे. वर्षानुवर्षे ही प्रक्रिया सुरू राहिली, तर बीटी कापसामध्ये असलेल्या बोंडअळीला प्रतिबंधक विष पचविण्याची शक्ती येण्याची शक्यता वाढली असून, बिगर बीटीऐवजी बीटी कापूस हेच या अळीचे मुख्य खाद्य होण्याची भीती निर्माण झाली आहे. म्हणूनच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी बीटी कापसासोबतच बिगर बीटीची पेरणी करण्याचे आवाहन शेतकर्‍यांना केले आहे. बांधावरील बिगर बीटीवर या बोंडअळ्य़ा उपजीविका करतील, त्यामुळे प्रतिकारक्षम बोंडअळ्य़ांचे प्रमाण ५0 टक्क्यांनी घटवता येईल. तसेच या बोंडअळ्य़ांच्या प्रतिकारक्षम पिढय़ांना काही वर्ष थोपवता येईल, असे या कापूस संशोधकांना वाटते.