शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीवर भरदिवसा ‘ब्लेड’ हल्ला

By admin | Updated: July 15, 2014 00:15 IST

एका तरुणीवर भरदिवसा अज्ञात इसमांनी घरात घुसून ब्लेडने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना

चोहोट्टा बाजार : अज्ञात चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याच्या अफवेने परिसरातील ग्रामस्थ दहशतीखाली असताना येथून जवळच असलेल्या ग्राम करोडी येथे एका तरुणीवर भरदिवसा अज्ञात इसमांनी घरात घुसून ब्लेडने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवार, १२ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली. करोडी येथील रघुनाथ जाधव हे दुपारच्या सुमारास विश्रांती घेत असताना, दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी त्यांची मुलगी प्रियंका जाधव (२0) ही कामात मग्न होती. या अज्ञात इसमांनी अचानक तिच्यावर ब्लेडने वार केले. या हल्ल्याने ती गांगरून गेली. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता अज्ञात हल्लेखोरांनी तिच्या ओढणीनेच तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. तेवढय़ात प्रियंकाची आई घरी परतली. आईला पाहताच आरोपींनी घरातून पळ काढला व प्रियंकाचे प्राण वाचले. ही वार्ता गावात पसरताच ग्रामस्थांनी जाधव यांच्या घराजवळ गर्दी केली. त्यानंतर काहींनी जखमी अवस्थेतील प्रियंकाला खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले व याबाबतची वर्दी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताचा दहीहांडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार ताराचंद किल्लेवाले व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळ गाठून प्रियंकाला पुढील उपचारासाठी अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात हलविले. या घटनेमुळे करोडी परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. दहीहांडा पोलिस पुढील तपास करीत आहेत.