शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

हाडांचे कर्दनकाळ गतिरोधक

By admin | Updated: November 24, 2014 01:26 IST

अकोला शहरात जीवघेणे गतिरोधक; कथित रस्तासुरक्षेसाठी मणक्यांच्या आजारास निमंत्रण.

विवेक चांदूरकर / अकोलारस्त्यांची झालेली दुदर्शा, त्यावर पडलेले खड्डे, नाली, वीज घेण्यासाठी रस्ता खोदल्यामुळे पडलेले खड्डे त्यातच मनपा व बांधकाम विभागाने बांधलेले अधिकृत गतिरोधक, यामुळे अकोलावासीयांची हाडे पुरती खिळखिळी होत आहेत. गतिरोधकाने हाडे फ्रॅक्चर होत असल्याने वाहनचालकांची शारीरिक व आर्थिक हानी होत आहे. खड्डय़ांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अकोला शहरात रस्त्यांची चाळणी झाली आहे. त्यातच असलेल्या गतिरोधकांमुळे हाडांच्या आजारांचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. दररोज वाहन चालविताना आपण अनेक गतिरोधकांवरून जातो, त्यावेळी हे गतिरोधक आपल्या आरोग्यास घातक असून, यामुळे मणक्याचे आजार होत असल्याची कल्पनाही आपल्याला नसते. मात्र, शहरात असलेल्या गतिरोधकांमुळे पाठीच्या मणक्यांसह हाडांचे आजार जाणवत असल्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या रुग्णालयात आपआपल्या स्तरावर उपचार करीत असल्यामुळे हाडाच्या आजारांचे प्रमाण अवाढव्य असले तरी ते समोर येत नाही. गतिरोधकांमुळे मात्र शहरातील हजारो नागरिक बाधित आहेत. वाहनांचा वेग कमी व्हावा, या उद्देशाने बांधण्यात येत असलेले ग ितरोधक चुकीच्या पद्धतीने व चुकीच्या ठिकाणी बांधण्यात येत असल्यामुळे फायद्याचे कमी नुकसानदायी जास्त ठरत आहेत. शहरात अनेक अनावश्यक गतिरोधक आहेत. या ग ितरोधकांची उंची किती असावी, ते कोणत्या ठिकाणी असावे व कशाप्रकारचे असावे, यासंबंधीच्या कोणत्याही नियमांचे पालन न करता हे गतिरोधक बांधण्यात आले आहेत. यामुळे वाहनचालकांना मणक्यांचे आजार होत आहेत. ज्या नागरिकांच्या हाडांमध्ये कॅल्शियम कमी असते, त्यांना गतिरोधकावरून वाहन गेल्यावर झटका बसला तर हाडात फ्रॅक्चर होतो. याचा उपचार करण्याकरि ता नागरिकांना हजारो रुपये खर्च करावा लागत असल्याचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. शैलेश देशमुख यांनी स्पष्ट केले.