सराफा दुकान फोडून सहा किलो चांदीचे दागिने लंपास

By Admin | Updated: January 21, 2015 01:05 IST2015-01-21T01:05:10+5:302015-01-21T01:05:10+5:30

अकोला येथील घटना; अज्ञात घरफोड्याविरुद्ध गुन्हा दाखल.

Break the bullion shop and carry six kg of silver ornaments | सराफा दुकान फोडून सहा किलो चांदीचे दागिने लंपास

सराफा दुकान फोडून सहा किलो चांदीचे दागिने लंपास

अकोला: जुने शहरातील जय हिंद चौकातील खंडेलवाल सराफा दुकान फोडून अज्ञात घरफोड्याने दुकानातील सहा किलो चांदी व सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना सोमवारी रात्री १२.३0 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
शिवाजीनगरात राहणारे गोपाल रामेश्‍वर खंडेलवाल(४९) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १९ जानेवारी रोजी रात्री १२.३0 वाजताच्या सुमारास जय हिंद चौकातील त्यांच्या सराफा दुकानावरील छताची फरशी काढून अज्ञात घरफोड्याने दुकानात प्रवेश केला आणि दुकानात ठेवलेले चांदीच्या पाटल्या १५ जोड, जोडवे ७0 नग, तोरड्या ५0 नग, मनगट्या, बिचवे, चांदीच्या अंगठय़ा २00 नग, ब्रासलेट सात नग, करदोडे असे सहा किलो ३00 ग्रॅम चांदीचे दागिने आणि सोन्याच्या २0 ग्रॅम वजनाच्या बेसर असा एकूण २ लाख ३0 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. खंडेलवाल यांच्या तक्रारीवरून जुने शहर पोलिसांनी अज्ञात घरफोड्याविरुद्ध भादंविच्या कलम ४५७, ३८0 नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: Break the bullion shop and carry six kg of silver ornaments