शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
3
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
4
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
5
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
6
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
7
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
8
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
9
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
10
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
11
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
12
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
14
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
15
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
16
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
17
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभरात दोघांचा मृत्यू; ७८ नवे पॉझिटिव्ह; १३ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 19:19 IST

अकोला शहरातील आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा २१३ वर पोहचला आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, मंगळवार २२ सप्टेंबर रोजी अकोला शहरातील आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा २१३ वर पोहचला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ७८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ६७५० झाली आहे. दरम्यान, मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २८६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ७८ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २०८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये जीएमसी येथील पाच, पारस व तेल्हारा येथील प्रत्येकी तीन, अष्टविनायक कॉलनी, मोठी उमरी, शिवाजी नगर, जूने शहर व खडकी येथील प्रत्येकी दोन, रेल ता. अकोट, आळशी प्लॉट, संतोष नगर, गोकूल कॉलनी, महसूल कॉलनी, डाबकी रोड, संकल्प कॉलनी, बाळापूर, हरिहर पेठ, बाशीर्टाकळी, चांदूर, अकोट, फीरदोस कॉलनी, चान्नी ता. पातूर, स्वराज्य पेठ, दहिगाव गावंडे, कौलखेड, अकोट फैल, राऊतवाडी व चोहट्टाबाजार येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये जूना तारफैल येथील पाच, हरिहर पेठ व शास्त्री नगर येथील प्रत्येकी तीन, डाबकी रोड, खोलेश्वर व अकोट येथील प्रत्येकी दोन, शिवाजी नगर, गीता नगर, मोठी उमरी, माधव नगर, जून कापड मार्केट, बजरंग चौक, रेणूका नगर, रणपिसेनगर, बहीर गेट, गोकूल कॉलनी, देवराव बाबा चाळ, खडकी, जवाहर नगर, जयहिंद चौक, वानखडे नगर, देशमुख फैल, सिंधी कॅम्प, दुर्गा चौक, रतनलाल प्लॉट, व गौरक्षण येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.एक महिला, एक पुरुषाचा मृत्यूमंगळवारी अकोला शहरातील आणखी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये कौलखेड भागातील ७२ वर्षीय महिला आणि सिव्हील लाईन परिसरातील ७० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. दोघांनाही १५ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.१,७४७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६,७५० लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४,७९० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २११ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,७४७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला