विहिरीत आढळला युवकाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:50 IST2020-12-04T04:50:46+5:302020-12-04T04:50:46+5:30

निहिदा: पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले भेंडी (काजी) शिवारातील एका विहिरीत युवकाचा मृतदेह आढळल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. ओम ...

The body of the youth was found in the well | विहिरीत आढळला युवकाचा मृतदेह

विहिरीत आढळला युवकाचा मृतदेह

निहिदा: पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले भेंडी (काजी) शिवारातील एका विहिरीत युवकाचा मृतदेह आढळल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. ओम प्रल्हाद बेलोरकार (२०) रा. भेंडी महाल असे मृत युवकाचे नाव आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विहिरीत मृतदेह आढळल्यानंतर पिंजर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. बुधवारी भेंडी (काजी) येथील एक युवक शिवारात गुरे चारण्यासाठी गेला असता, त्याला दुर्गंधी येत असल्याने तो विहिरीत पाहण्यासाठी गेला असता, त्याचा मृतदेह आढळून आला. ओम बेलोरकार हा गत २२ दिवसांपासून घरून निघून गेला होता. बुधवारी भेंडी( काजी) शिवारात भेंडगाव येथील आनंदराव भगत यांच्या शेतात त्याचा मृतदेह आढळून आल्याने पोलिसांनी घातपाताची शक्यता वर्तविली आहे. पोलिसांनी मृतदेह उत्तरनिय तपासणीसाठी रवाना केला असून, पुढील तपास ठाणेदार पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: The body of the youth was found in the well