शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

सिकलसेलचा २१ जिल्ह्यांना विळखा

By admin | Updated: January 2, 2015 01:35 IST

‘एनजीओ’चे ६२ आमदार, १७ खासदारांना पत्र.

आशिष गावंडे / अकोलासिकलसेल आजाराबाबत जनजागृती करून त्यावर ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे राज्यातील २१ जिल्ह्यांना सिकलसेलने विळखा घातल्याचे समोर आले आहे. आजाराची गंभीरता लक्षात घेता, नागपूर येथील ह्यएनजीओह्णने तब्बल ६२ आमदार व १७ खासदारांना पत्र पाठवून सिकलसेलच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घेण्याची विनंती केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात सिकलसेलच्या गंभीर विषयावर विधिमंडळात चकार शब्दही निघाला नाही, हे येथे उल्लेखनीय.राज्यातील ३६ पैकी २१ जिल्ह्यांमध्ये सिकलसेल आजाराने ग्रस्त रुग्णांचा जीव मेटाकुटीला आला आहे. आजाराला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृतीसाठी ठोस कार्यक्रम राबविण्याची आवश्यकता असताना, असा कोणताही कार्यक्रम राबविल्या जात नसल्याची भीषण परिस्थिती आहे. सिकलसेलने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून येणार्‍या निधीची पुरेशी माहिती नसल्याने रुग्णांना निधीचा लाभ घेता येत नाही. परिणामी राज्यात मोठय़ा प्रमाणात या रुग्णांची संख्या वाढत आहे. सिकलसेल हा आनुवंशिक आजार असल्यामुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. या आजाराची वाच्यता करण्यासाठी रुग्ण तयार होत नसल्याने अशा रुग्णांचे अवयव कमजोर होऊन त्यांचे मृत्यू होत असल्याची माहिती आहे. सिकलसेल आजाराबाबत राज्यभरातील स्थितीचा अभ्यास करणार्‍या नागपूर येथील सिकलसेल सोसायटी ऑफ इंडिया या स्वयंसेवी संस्थेने राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पत्रव्यवहार केला. परंतु यासंदर्भात संबंधित यंत्रणा प्रचंड उदासीन असल्याची खंत स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष संपत रामटेके यांनी व्यक्त केली. राज्य शासनाच्या सिकलसेल पीडितांमध्ये सर्व वयातील रुग्णसंख्या किती, याची आकडेवारी शासनाकडे उपलब्ध नाही. यामुळे मागील दहा वर्षांत या आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नसल्याची स्थिती या संस्थेने मांडली असून, राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या वाढत असल्याची माहिती पत्राद्वारे ६२ आमदार व १७ खासदारांना देण्यात आली. सिकलसेलसाठी देशभरात २0 मालिक्युर जेनेटिक प्रयोगशाळा सुरू करण्याचा निर्णय तत्कालीन यूपीए सरकारच्या कार्यकाळात घेण्यात आला होता. सिकलसेलग्रस्त रुग्णांची सर्वाधिक संख्या पूर्व व पश्‍चिम विदर्भात असताना, दोन मालिक्युर जेनेटिक प्रयोगशाळा मुंबईमध्ये व दोन पुण्याला कार्यान्वित करण्यात आल्या. विदर्भात एकही प्रयोगशाळा नसल्याने गडचिरोली, चंद्रपूरमधील रुग्णांना तपासणीसाठी थेट मुंबई किंवा पुणे येथे जावे लागते. गोरगरीब रुग्णांसाठी ही बाब शक्य नाही. विदर्भातील लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके यांनी व्यक्त केले.