शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

तीनपट कर आकारणीच्या विरोधात भाजपचा शंखनाद

By admin | Updated: August 27, 2015 00:56 IST

महापालिकेत विशेष सभेचे होणार आयोजन.

अकोला: अकोलेकरांना साध्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरलेल्या महापालिका प्रशासनाने भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांवर तब्बल तीनपट कर आकारणीचा प्रस्ताव तयार केला. हा विषय ह्यलोकमतह्णने सतत लावून धरल्यानंतर बुधवारी सत्ताधारी भाजपने वाढीव कर आकारणीच्या विरोधात शंखनाद फुंकला. या विषयावर २ सप्टेंबर रोजी विशेष सभा आयोजित करण्याचा निर्णय महापौर उज्ज्वला देशमुख यांनी घेतला आहे. महापालिकेने मागील १७ वर्षांपासून शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन का केले नाही, असा प्रश्न उपस्थित होते. आजपर्यंत मनपाच्या तिजोरीला ओरबडणार्‍या कर्तव्यतत्पर प्रशासनाने कर्मचार्‍यांच्या वेतनाची समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी पुनर्मूल्यांकन मोहीम सुरू केली. अकोलेकरांना नियमित कर आकारणी केल्यास मनपाला किमान ३५ ते ४0 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होऊ शकते. अशास्थितीत आयुक्त सोमनाथ शेटे यांनी भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणाली लागू करण्याचा प्रस्ताव दामटला. तर इतर अधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांना वेतनाच्या मुद्यावर दिवास्वप्न दाखवणे सुरू केले. भांडवली मूल्यावर कर आकारणी केल्यास अकोलेकरांवर तीनपट कर लादल्या जाणार, हे निश्‍चित आहे. त्या बदल्यात नागरिकांना मूलभूत सुविधा मिळतील का, या मुद्यावर प्रशासनाची बोलती बंद होते. तीनपट कर आकारणीचा प्रस्ताव आयुक्तांच्या स्वाक्षरीसाठी मनपात पडून असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांच्या पायाखालची वाळू सरकली. अखेर हा प्रस्ताव रद्द करण्यासाठी सत्तापक्ष भाजपने पुढाकार घेत, २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन केले आहे. यासोबतच खुले नाट्यगृहानजीकच्या १२ दुकानांचे नवनिर्माण करण्याच्या विषयाला परवानगी देऊन मंजुरीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविल्या जाणार आहे. यानंतर दुपारी १ वाजता १४ ऑगस्ट रोजीच्या स्थगित सर्वसाधारण सभेचे आयोजन केले जाईल.