शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
2
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
3
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
4
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
5
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
6
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
7
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
8
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
9
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
10
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
11
Rahul Gandhi: "शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
12
युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी
13
निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट
14
Komal Ganatra : संघर्षगाथा! लग्नानंतर १५ व्या दिवशी पतीने सोडलं, लोकांच्या टोमण्यांना दिलं सडेतोड उत्तर, झाली IRS
15
फ्रान्समध्ये मराठीचा डंका, प्राजक्ता माळीने 'कान्स'मधून शेअर केला व्हिडीओ; तिचा लूक पाहिलात?
16
हनिमूनच्या दिवशीच नवविवाहितेवर लैंगिक अत्याचार; मसाजच्या बहाण्याने ६१ महिलांचे आयुष्य केलं उद्ध्वस्त
17
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
18
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
19
"रजनीकांत इतका नीच नाही की...", CM विजय यांच्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना थलायवाने सुनावलं, म्हणाले...
20
मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार; आरोपी अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

बहुजन समाजाची मोट बांधण्यात भारिप-बमसंला अपयश !

By admin | Updated: May 16, 2014 21:30 IST

अकोला जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेतील गचाळ कारभार भारिप-बमसंला भोवला; राजकीय विश्लेषकांचे मत

अकोला : बौद्धतेतर समाजाची मोट बांधण्यात आलेले अपयश आणि सत्ता असलेल्या जिल्हा परिषद व महापालिकेतील गचाळ कारभारामुळे लोकसभा निवडणुकीत भारिप-बमसंचे उमेदवार ॲड. प्रकाश आंबेडकर हे तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेवर भारिप-बमसंची १० वर्षांपेक्षा जास्त काळापासून सत्ता आहे. पक्ष संघटनेतही सर्वच समाजातील धुरिणींना स्थान देण्यात आले. वेळोवेळी भारिप-बमसंने इतर समाजातील घटकांना विधानसभा, जिल्हा परिषद आणि महापालिकेतील सत्तेत सहभागी करून घेतले. जेणेकरून लोकसभेत बौद्ध समाजासह सत्तेत सहभागी करून घेतलेल्या समाजातील नेते, पदाधिकार्‍यांची मते पारड्यात पडतील. मात्र, प्रत्येक लोकसभा निवडणुकीत भारिप-बमसंला बौद्ध समाज वगळता इतर समाजातील मते खेचण्यात यश आल्याचे दिसून येत नाही.
यंदाच्या निवडणुकीत १ लाख ८२ हजार ३७१ मतदार वाढले. हे नवमतदार खेचण्यात भारिप-बमसंला अपयश आल्याचे दिसून येते. २००९ च्या निवडणुकीत भारिप-बमसंचे उमेदवार ॲड. प्रकाश आंबेडकर यांना २ लाख २२ हजार ६७८ मते तर यंदाच्या निवडणुकीत त्यांना २ लाख ३८ हजार ७७६ मते मिळाली. या निवडणुकीत ते तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले. जिल्हा परिषद आणि मनपामध्ये भारिप-बमसंची सत्ता असून, दिवसेंदिवस जिल्हा आणि महानगराची अवस्था बकाल होत आहे. बहुजन समाजाची मोट न बांधणे, रस्ते, पाणी, आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधा देण्यात पक्षाला यश आलेले नाही.