शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील हॉटेल्स, खाणावळींना बायोगॅस अनिवार्य!

By admin | Updated: May 5, 2015 01:25 IST

अकोला महानगरपालिका घेणार निर्णय.

अकोला: महानगर पालिकेच्यावतीने आता शहरातील मोठे हॉटेल्स, खाणावळी व अपार्टमेंटला बायोगस प्रकल्प अनिवार्य करण्यात येणार आहे. लवकरच मनपाच्यावतीने शहरातील हॉटेल्सला नोटीस पाठविण्यात येणार आहे. जसजशी लोकसंख्या वाढत आहे, तसतसा गॅसचा वापर वाढला आहे. त्यामुळे पर्यावरणाची मोठय़ा प्रमाणात हानी होत आहे. गॅसचा वापर वाढल्यामुळे तुटवडाही भासत आहे. शासनाला एका सिलिंडरवर ग्राहकाला मोठी सबसिडी द्यावी लागते. त्यामुळे देशाचेही आर्थिक नुकसान होते. नुकसान टाळणे व पर्यावरणाचे संवर्धन करण्याकरिता बायोगॅस निर्मितीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शासनाने पावले उचलणे सुरू केले आहे. घरामध्ये असलेल्या ओल्या कचर्‍यापासून बायोगॅस निर्मिती करण्यात येते. दैनंदिन उपयोगातून निर्माण होणारा कचरा नागरिक घरासमोर फेकतात. या कचर्‍याची नियमित साफसफाई होत नाही. त्यामुळे घाण साचते, परिणामी मच्छरांचा सुळसुळाट होतो व आजारांची लागण होते. अकोला शहरात कचर्‍याच्या समस्येने विराट रूप धारण केले आहे. त्यामुळे आजारांमध्येही वाढ होत आहे. मनपाने यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येकच हॉटेल्स, खानावळी व मोठय़ा अपार्टमेंटमधील नागरिकांना बायोगॅस प्रकल्प अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आयुक्त सोमनाथ शेटे यांनी दिली. यासोबतच नवीन बांधकाम करणार्‍या अपार्टमेंटलाही बांधकामाची परवानगीच्या वेळीच बायोगॅस सुरू करण्याचे लेखी द्यावे लागणार आहे. एखाद्या घरात लागणार्‍या गॅसच्या ४0 टक्के गॅस बायोगॅस प्रकल्पापासून निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांच्या मासिक खर्चात बचत होऊ शकते. त्यामुळे बायोगॅसची निर्मिती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. महानगरपालिकेत बायोगॅस कशाप्रकारे बनवायचा, याची नुकतीच कार्यशाळा पार पडली. यावेळी बायोगॅस बनविण्याबाबत प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.