शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी बँकांची टोलवाटोलवी

By admin | Updated: May 8, 2015 01:45 IST

अकोला जिल्ह्यातील कर्जदार शेतक-यांना हेलपाटे.

संतोष येलकर/ अकोला: दुष्काळी परिस्थितीत कर्जदार शेतकर्‍यांच्या कर्जाचे पाच वर्षांंसाठी पुनर्गठन करून, त्यांना पुन्हा पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला असला तरी, याबाबतचा आदेश प्रा प्त झाला नसल्याचे सांगत कर्जदार शेतकर्‍यांनी यापूर्वी घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठन करण्यास जिल्हय़ात बँकांकडून टोलवाटोलवी करण्यात येत आहे. त्यामुळे कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी बँकांमध्ये जाणार्‍या जिल्ह्यातील कर्जदार शेतकर्‍यांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत आहेत. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी संकटात सापडला. या पृष्ठभूमीवर २0१४-१५ मध्ये पीक कर्ज घेतलेल्या कर्जदार शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पाच वर्षांंसाठी पुनर्गठन करून, कर्जदार शेतकर्‍यांना यावर्षी पुन्हा कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनामार्फत ७ एप्रिल रोजी घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील कर्जदार शेतकर्‍यांच्या कर्जाचे पाच वर्षांंंसाठी पुनर्गठन करून, त्यांना यावर्षी पुन्हा कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांनी १३ व २६ एप्रिल रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह जिल्ह्यातील सर्व २९ राष्ट्रीयीकृत बँकांना दिले. परंतु, कर्जदार शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेकडून अद्याप सुरू करण्यात आले नाही. तसेच कर्जाचे पुनर्गठन करण्याबाबत कोणताही निर्णय किंवा आदेश प्राप्त झाला नसल्याचे काही राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्जदार शेतकर्‍यांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पाच वर्षांंसाठी पुनर्गठन करण्याच्या कामात जिल्ह्यातील बँकांकडून टोलवाटोलवी केली जात असून, कर्जाचे पुनर्गठन व पुन्हा कर्ज उपलब्ध होण्यासाठी बँकांमध्ये जाणार्‍या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत आहेत.