शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

बाळापूर : राजकीय समीकरण बदलणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 13:10 IST

बंडखोरांची उमेदवारी कायम राहिल्यास राजकीय समीकरण बदलणार आहे.

- अनंत वानखडे  लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर: बाळापूर मतदारसंघामध्ये दिग्गज नेत्यांनी स्वपक्षाच्या उमेदवारांविरोधात दंड थोपटून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या बंडखोरांची उमेदवारी कायम राहिल्यास राजकीय समीकरण बदलणार आहे.बाळापूर मतदारसंघ हा परंपरागत भाजप, काँग्रेसचा मानल्या जातो; परंतु यंदा ही जागा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीने डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, भाजप-सेना युतीने नितीन देशमुख, काँग्रेस-राकाँ आघाडीचे संग्राम गावंडे यांना उमेदवारी जाहीर केली; परंतु त्यांना बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते आमदार बळीराम सिरस्कार यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांची व समर्थकांची नाराजी आहे. भाजप, काँग्रेसला ही जागा सोडावी लागल्यामुळे भाजप, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. वंचित बहुजन आघाडीचे आमदार बळीराम सिरस्कार, प्रा. डॉ. संतोष हुशे, गजानन दांदळे, डॉ. रहेमान खान, अश्वजित सिरसाट यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून उमेदवार डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांची अडचण वाढविली आहे. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश तायडे, माजी जि. प. सदस्य पंढरी हाडोळे, चंद्रशेखर चिंचोळकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करून काँग्रेस-राकाँ आघाडीचे उमेदवार संग्राम गावंडे यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. यासोबतच माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, शिवसंग्रामचे संदीप पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करून युतीला अडचणीत आणले आहे. एवढेच नाही, तर स्वाभिमानी पक्षाकडून उद्योजक तुकाराम दुधे यांनीही अर्ज दाखल केला आहे. या बंडखोरीचा फटका या तीनही उमेदवारांना बसू शकतो. त्यामुळे नाराज इच्छुकांची या उमेदवारांना मनधरणी करून बंडखोरी थोपवून धरण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे.दरम्यान, वंबआ, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेले तीनही उमेदवार प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, संग्राम गावंडे, नितीन देशमुख हे नवखे आहेत. त्यापैकी नितीन देशमुख गत निवडणुकीचा अनुभव गाठीशी आहे. पुंडकर, गावंडे यांना बाळापूर मतदारसंघाचा अभ्यास असला तरी, त्यांना गावोगावी फिरून जनसंपर्क साधण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. हे सर्व बंडखोर उमेदवार रिंगणात कायम राहतात की माघार घेतात, याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :balapur-acबालापूरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019