शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

बाळापूर निवडणूक निकाल : परिवर्तन होणार की ‘वंचित’ जागा कायम ठेवणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 07:35 IST

Balapur Vidhan Sabha Election Results 2019: बाळापूर मतदारसंघात परिवर्तन होणार की ही जागा वंचित बहुजन आघाडी कायम राखणार, हे आज मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

बाळापूर: मतदारसंघामध्ये भाजप-सेना युती, काँग्रेस-राकाँ महाआघाडी, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या उमेदवारांमध्ये सोमवारी मतदानाच्या दिवशी काट्याची चौरंगी लढत पाहावयास मिळाली. आता बाळापूर मतदारसंघात परिवर्तन होणार की ही जागा वंचित बहुजन आघाडी कायम राखणार, हे आज मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.बाळापूर मतदारसंघामध्ये राजकीय पक्षांनी प्रथमच नवे उमेदवार रिंगणात उतरविले. दहा वर्षांपासून हा मतदारसंघ भारिप-बमसं (वंचित बहुजन आघाडी)च्या ताब्यात आहे. यंदा भाजपच्या वाट्याची ही जागा सेनेला सुटली आणि सेनेने जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांना संधी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसनेसुद्धा बाळापूर मतदारसंघ प्र्रतिष्ठेचा करीत, काँग्रेसकडून ही जागा खेचून आणली. राकाँने जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांना रिंगणात उतरवून चुरस निर्माण केली. वंचित बहुजन आघाडीने विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार यांचे तिकीट कापून डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांना संधी देत, मराठा कार्ड खेळले. ऐनवेळी वंचितमधून बाहेर पडलेले डॉ. रहेमान खान यांनी प्रथम एमआयएमचा झेंडा हाती घेत, निवडणूक प्रतिष्ठेची केली. सोमवारी झालेल्या मतदानामध्ये नव्या दमाचे उमेदवार रिंगणात असल्याने, मतदारांमध्येसुद्धा उत्साह दिसून आला. मोठ्या उत्साहात मतदान केंद्रांवर जात मतदारांनी मतदान करून कर्तव्य बजावले. चारही राजकीय पक्षांमध्ये सोमवारी चांगलीच चुरस बघायला मिळाली. बाळापूर मतदारसंघात जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झाल्यामुळे उमेदवारही खुशीत दिसत होते.चारही राजकीय पक्षांचे उमेदवार तगडे असल्यामुळे त्यांचा विजय होणार असल्याचे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सांगत आहेत. चौरंगी लढतीमुळे निवडणुकीचा काय निकाल लागेल, हे सांगणे कठीण असले तरी, अंदाजानुसार उमेदवार विजय आपलाच होणार असल्याचा दावा करीत आहेत.भाजपला ही जागा न सुटल्यामुळे भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सेना उमेदवाराच्या प्रचारात दिसून आले नाहीत. त्याचा फटका सेनेला बसू शकतो. एमआयएममुळे मुस्लीम मतांचे विभाजन कोणाच्या पथ्थ्यावर पडते तसेच अखेरच्या दोन दिवसांमध्ये काँग्रेस-राकाँ उमेदवार आणि वंचित बहुजन आघाडीने जनसंपर्क, जातीय समीकरणावर भर देत, चांगलीच चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आता या मतदारसंघात परिवर्तन होणार की वंचित ही जागा कायम राखणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019balapur-acबाळापूरShiv SenaशिवसेनाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी