शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर सुनंदा मोरेचा जामीन फेटाळला

By admin | Updated: October 17, 2014 01:19 IST

एक हजार रुपयांची लाच स्वीकारणा-या लाचखोर सहायक उपनिबंधकाची दिवाळी कोठडीतच.

अकोला: एक हजार रुपयांची लाच स्वीकारणारी लाचखोर सहायक उपनिबंधक सुनंदा मोरे हिने व तिच्या दोन सहकार्‍यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने सुनंदा मोरे हिचा जामीन फेटाळून लावला. तिच्या दोन सहकार्‍यांची जामिनावर सुटका केली. बँकेत गहाण असलेल्या प्लॉटवर बोजा चढवायला आवश्यक असलेल्या खतावणी प्रमाण पत्रासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारणार्‍या सहायक उपनिबंधक सुनंदा चिंतामण मोरे व तिचे सहकारी आशीष पिंजरकर, हिंमत शिराळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी सुनंदा मोरे हिच्या दुर्गा चौकातील निवासस्थानाची झडती घेतली होती. झडतीदरम्यान मोरेकडे ३३ लाख रुपयांची संपत्ती व पुण्यामध्ये बंगला असल्याची माहिती प्राप्त झाली होती. सुनंदा मोरे हिच्या दोन सहकार्‍यांनीसुद्धा जामिनासाठी न्यायालयाकडे अर्ज केला होता. त्यापैकी आशीष पिंजरकर व हिंमत शिराळे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला; परंतु सुनंदा मोरे हिचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्याने तिला दिवाळी होईपर्यंत कारागृहामध्ये दिवस काढावे लागणार आहेत. सरकारतर्फे अँड. प्रवीण चिंचोले यांनी काम पाहिले.