शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कार जनजागृतीसाठी सार्थकी लावू!

By admin | Updated: May 18, 2015 01:27 IST

स्वच्छतेचा ध्यास घेतलेला नववधूचा निर्धार; आंदणात मिळविले होते तयार शौचालय.

राजेश्‍वर वैराळे / बैरगाव वैराळे : स्वच्छेबाबत व्यापक जनजागृती आवश्यक आहे. गाव हगणदारीमुक्त होण्यासाठी सर्वच समाजघटकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुरस्काराच्या माध्यमातून मिळणारी काही रक्कम स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी सुरू करण्यात आलेल्या भारत एक कदम या चळवळीच्या माध्यमातून खर्च करू, असा निर्धार आंदणात तयार (रेडिमेड) शौचालय मिळविलेल्या चंदा ऊर्फ चैताली दिलीप गाळखे (राठोड) हिने रविवारी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. लग्नात आंदण म्हणून तयार शौचालय मिळवून स्वच्छतेचा आयकॉन ठरलेल्या चंदाला सुलभ इंटरनॅशल संस्थेने पुरस्कार जाहीर केला. या पृष्ठभूमीवर चंदाने लोकमतशी रविवारी संवाद साधला. तिचे लग्न १५ मे रोजी कारंजा रमनाजपूर (नया अंदुरा) येथे झाले होते.

प्रश्न :- आंदणात तयार शौचालयाची मागणी करावी, ही प्रेरणा कोठून मिळाली?

चंदा :- अंत्री मलकापूर येथे राहत असलेले माझे नातेवाईक अरविंद देठे हे स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी भारत एक कदम ही चळवळ राबवितात. ते रेडिमेड शौचालय तयार करतात. मी त्यांच्याकडे नेहमीच जात असे. त्यामुळे माझाही या चळवळीशी संपर्क आला. माझ्या परीने मीही या चळवळीत सहभागी झाले. लग्न निश्‍चित झाल्यानंतर सासरी शौचालय नाही, हे मला समजले. त्यामुळे आंदणात तयार शौचालय मिळावे, यासाठी मी आग्रह धरला.

प्रश्न :- तयार शौचालयाच्या आग्रहाला प्रतिसाद कसा मिळाला ?

चंदा :- तयार शौचालयाच्या आग्रहाचे कुटुंबीय आणि नातेवाइकांनी कौतुक केले. मावसा गजानन नाडे यांनी तयार शौचालयासाठी अरविंद देठे यांच्याशी संपर्क साधला. सर्वांंच्याच पुढाकाराने मला तयार शौचालय मिळाले.

प्रश्न :- स्वच्छतेच्या संदर्भात शासनाकडून कोणती अपेक्षा आहे?

चंदा :- सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणार्‍या जोडप्यास शासनाकडून अनुदान देण्यात येते; मात्र आता शासनाने मुलीच्या सासरी शौचालय नसल्यास तिला तयार (रेडिमेड) शौचालय द्यावे.

प्रश्न:- आता लग्नानंतरही स्वच्छतेबाबत जागृतीसाठी प्रयत्न करणार काय?

चंदा:- हो, स्वच्छतेसाठी शासनाच्या खांद्यांला खांदा लावून समाजातील प्रत्येक घटकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

प्रश्न :- स्वच्छ भारत मिशन कसे यशस्वी होईल?

चंदा :- प्रत्येक मुलीने उघड्यावर शौचाला जाणार नाही, असा निर्धार करणे गरजेचे आहे. या निर्धाराला समाजातील प्रत्येक घटकाने प्रतिसाद देणे आवश्यक आहे. असे झाल्यास संपूर्ण देश खर्‍या अर्थाने स्वच्छ होईल.