शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंकेला पळून जाण्याचा प्रयत्न; आरोपीला बंगळुरू विमानतळावर अटक

By आशीष गावंडे | Updated: March 7, 2025 22:32 IST

ऑनलाइन सट्टा प्रकरण; अकोला स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

आशिष गावंडे, अकोला: श्रीलंकेला पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ऑनलाइन सट्टा प्रकरणातील फरार आराेपी महेश बाबाराव डिक्कर (रा.लाेहारी खुर्द ता.अकाेट जि. अकोला) याला ६ मार्च राेजी बंगळूरु विमानतळावरुन अटक करण्याची कारवाइ अकाेला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. आराेपीविराेधात पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी ‘लूक आऊट नाेटीस’जारी केली हाेती. यामुळे आराेपीला बेड्या ठाेकण्यात मदत झाली.

ऑनलाइन सट्टा खेळविणाऱ्या एका आंतरराज्यीय टाेळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला हाेता. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी पोलिस अधीक्षक बच्चनसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेळके यांनी गोपनीय माहितीच्या आधारे बार्शीटाकळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कातखेड शिवारातील एक फार्म हाऊसवर छापा मारला हाेता. याठिकाणी ऑनलाईन सट्टा चालवला जात होता, ज्यामध्ये मोबाईल,लॅपटॉप व इतर अत्याधुनिक साधनांचा वापर केला जात होता. या प्रकरणात पोलिसांनी फरार महेश बाबाराव डिक्कर व मोनीश गुप्ता या दोन मुख्य आरोपींवर लक्ष केंद्रित केले. दरम्यान,बंगळूरू विमानतळावरुन आरोपीला अटक करून शुक्रवार ७ मार्च राेजी स्थानिक न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला १० मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. फरार माेनिष गुप्ताचा पाेलिस कसून शाेध घेत आहेत. आराेपींचे आंतरराष्ट्रीय कनेक्शनपाेलिस तपासात हे उघडकीस आले की, महेश डिक्कर हा दुबईमध्ये ऑनलाइन सट्ट्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेला होता.आराेपींचे दुबइ, श्रीलंका असे आंतरराष्ट्रीय कनेक्शन लक्षात घेता दाेन्ही फरार आराेपी विदेशात पळून जाऊ शकतात,अशी शक्यता असल्याने पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी लूक आऊट नाेटीस जारी केली हाेती. जिल्ह्याच्या इतिहासात अशी नाेटीस पहिल्यांदाच जारी करण्यात आली. लुक आऊट सर्क्युलरमुळे बेड्याया प्रकरणातील फरार आराेपी महेश डिक्कर, माेनिष गुप्ता यांच्याविराेधात लुक आऊट सर्क्युलर जारी केल्यामुळे डिक्कर याला बंगळूरु विमानतळ प्रशासनाने ताब्यात घेतले. विमानतळ प्रशासनाने अकोला पोलिसांशी संपर्क साधला असता, स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस उपनिरीक्षक गाेपाल जाधव, अंमलदार अब्दुल माजीद यांना तातडीने बंगळूरू येथे रवाना करण्यात आले.

टॅग्स :Akolaअकोला