धक्कादायक! पैसे मागितले म्हणून मद्यपीने दारूची बाटली कर्मचाऱ्याच्या डोक्यात फोडली

By नितिन गव्हाळे | Updated: September 6, 2022 16:35 IST2022-09-06T16:35:03+5:302022-09-06T16:35:03+5:30

पैसे मागितले म्हणून मद्यपीने कर्मचाऱ्याच्या डोक्यात बाटली फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

As he demanded money, the drunkard broke the liquor bottle on the employee's head | धक्कादायक! पैसे मागितले म्हणून मद्यपीने दारूची बाटली कर्मचाऱ्याच्या डोक्यात फोडली

धक्कादायक! पैसे मागितले म्हणून मद्यपीने दारूची बाटली कर्मचाऱ्याच्या डोक्यात फोडली

अकोला: वाईन शॉपमधून दारूची बाटली घेतल्यानंतर कर्मचाऱ्याने पैशांची मागणी केली असता मद्यपीने संतापून काचेची दारूची बाटली कर्मचाऱ्याच्या डोक्यावर फोडली. या हल्ल्यात कर्मचारी निरज तेलकर गंभीर जखमी झाला आहे. ही घटना ४ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी ५ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांकडून गुन्हा दाखल 
शिवाजी नगरात राहणारा निरज गणेश तेलकर (३२) याच्या तक्रारीनुसार तो चांदेकर चौकातील देशी दारूच्या दुकानात काम करतो. ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास युसूफ नामक व्यक्ती तेथे आला. त्याने दारूची क्वार्टर मागितली. त्याला क्वार्टर दिल्यानंतर पैसे मागितले असता, त्याने पैसे नाहीत, असे सांगितले. त्यामुळे त्याला क्वार्टर परत दे, असे म्हटल्यावर, त्याने निरज तेलकर याच्या डोक्यावर काचेची दारूची बाटली फोडून त्याला गंभीर जखमी केले. तसेच युसूफने यापुढे दारूचे पैसे मागितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: As he demanded money, the drunkard broke the liquor bottle on the employee's head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.