धारदार शस्त्र घेऊन दहशत पसरविणाऱ्या अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:18 IST2021-04-08T04:18:46+5:302021-04-08T04:18:46+5:30

अकोला : अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नायगाव येथील रहिवासी एक युवक याच परिसरात हातात धारदार शस्त्र घेऊन दहशत ...

Arrested for spreading terror with a sharp weapon | धारदार शस्त्र घेऊन दहशत पसरविणाऱ्या अटकेत

धारदार शस्त्र घेऊन दहशत पसरविणाऱ्या अटकेत

अकोला : अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नायगाव येथील रहिवासी एक युवक याच परिसरात हातात धारदार शस्त्र घेऊन दहशत पसरवीत असताना पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने छापा टाकून त्यास ताब्यात घेतले. या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नायगाव येथील रहिवासी शेख असिफ शेख नबी वय ३० वर्ष हा हातात धारदार शस्त्र घेऊन दादागिरी करीत असून सामान्य नागरिकांना धमकावत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून पाटील यांनी पथकासह धाव घेऊन आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक तलवार जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.

Web Title: Arrested for spreading terror with a sharp weapon