शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांची होरपळ सुरूच

By admin | Updated: May 15, 2015 23:35 IST

राज्यात ३0 मे रोजी विविध आंदोलन; एका वर्षापासून वाढीव मानधन नाही.

हर्षनंदन वाघ / बुलडाणा : अंगणवाडी सेविका आणि मदतनिस यांचे मागील एका वर्षापासून वाढिव मानधन मिळाले नसल्यामुळे राज्या तील २ लाख १0 हजार अंगणवाडी सेविका व मदतीसांवर उपासमारीची पाळी आली आहे. प्रशासनाकडे पाठपुरावा करून सुध्दा दाद मिळत नसल्याने अखेर या महिलांनी ३0 मे रोजी राज्यभरात सिटूच्या नेतृत्वात विविध आंदोलने करणार आहे. राज्यात २ लाख १0 हजार अंगणवाडी सेविका व मदतनिस ग्रामीण व शहरी भागात बालाकांना संस्काराचे धडे देतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतात. बुलडाणा जिल्ह्यात ५ हजार सेविका आणि २ हजार ५00 मदतनीस आहेत. यासर्व कर्मचार्‍यांचे मागील एका वर्षापासून पासून शासनाने मानधन दिले नाही. त्यामुळे या महिलांवर उपासमारीची पाळी आली आहे. यासंदर्भात अंगणवाडी सेवीका आणि मदतनिस यांनी संघटनेच्या माध्यमातून बुलडाण्यापासून तर मुंबई मंत्रालयापर्यंंत अनेक आंदोलने केली त तथापि सरकारने दाद दिली नाही. अखेर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या अंगणवाडी सेविकांनी मार्च महिन्यात असहकार आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनादरम्यान एका आंदोलनकर्त्यांं महिलेचा मृत्यू झाला होता. दरम्यान महिला व बालकल्याण मंत्री पंकजाताई मुंढे यांच्यातर्फे वाढीव मानधनाबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र एका महिन्याच्या कालावधी उलटल्यानंतर कोणत्याच प्रकारची हालचाल न झाल्यामुळे पुन्हा अंगणवाडी सेविका व मतदनीस यांनी सिटूच्या नेतृत्वात ३0 मे रोजी राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.